Back to Top

Tag Archives: #QualityEducationForAll

माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..

माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..

शिक्षण या विषयावर गेली काही वर्षे, माझे जे वाचन झाले, स्नेहच्या शिक्षणाच्या निमित्ताने माझे जे निरीक्षण झाले, त्यानुसार माझ्यापुरती मी शिक्षणाची व्याख्या तयार केली आहे, ती म्हणजे,
उत्सुकतेपोटी नवीन गोष्टींचा शोध घेणे, शोध घेता घेता आपल्या क्षमतांचा अंदाज बांधणे, त्या क्षमतांच्या जोरावर शिकलेल्या गोष्टी वापरून बघणे आणि त्यातून आपल्या “कम्युनिटी”तील आपले स्थान बळकट करणे, म्हणजे शिक्षण.

या शिक्षणाच्या प्रक्रियेत पालक म्हणून माझी भूमिका या व्याख्येला अनुसरून काय असली पाहिजे? माझ्या अनुभवानुसार मी माझी भूमिका पुढीलप्रमाणे निवडली आहे. Continue Reading

#NIOS #homeschooling

#NIOS
#homeschooling
#openschooling
#QualityEducationForAll

आपल्या देशात दर्जेदार शिक्षणाची परंपरा फार प्राचीन असली, तरी मधल्या बऱ्याच मोठ्या कालखंडात शिक्षणाच्या बाबतीत खूपच उलथापालथ झालेली होती. ब्रिटिशांनी शिक्षणाची काही व्यवस्था बसवली, तरी ती त्यांच्या सोयीची होती.

ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रचंड लोकसंख्या, जात/ धर्म/ भाषा/ आर्थिक स्तर/ सामाजिक स्तर/ भौगोलिक/ ऐतिहासिक अशा सर्व प्रकारची विविधता असताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च, तांत्रिक, व्यावसायिक अशा सर्व स्तरांवर शिक्षणाची घडी नीट बसवावी लागणार होती. Continue Reading