पालकची भजी :
एका पातेल्यामध्ये बेसनाचं पिठ घ्या. बेसन पिठामध्ये चिरलेला पालक, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करा. मग एका कढई मध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर मिश्रणाच्या खमंग भजी तळून घ्या. अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यावेळी त्यांना याच पालेभाज्या पासून हटके पदार्थ करून खाऊ घालू शकता.

मेथी गोटा भजी :
ही थोडी वेगळ्या प्रकारची भजी आहे. सर्वात आधी मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारिक चिरून घ्या. त्यानंतर मिरच्या, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या. मग बेसन पिठ भिजवून घ्या.  त्यानंतर सगळं बेसनाच्या पिठा मध्ये एकत्र करून घ्या. त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, मीठ आणि रवा घालून एकत्र करा. कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भजी तळून घ्या. गरमा गरम भजी खाण्यासाठी तयार आहेत. चटणी किंवा सॉस सोबत तुम्ही भजी खाऊ शकता.

कांदा भजी :
कोणताही ऋतू असो; हिवाळा, पावसाळा किंवा मग उन्हाळा, निवांत क्षण अजून आनंददायी बनवण्या साठी कांदा भजीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी आधी कांदा पातळसर कापून त्यावर मीठ घालून १५ मि. बाजूला ठेवा म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. मग १ कप बेसन, ४ हिरव्या मिरच्या, थोडे जाडसर कुटलेले धणे, चवीनुसार मीठ, हळद, तिखट हे साहित्य एकत्र करून छान मळून घ्या. जेणेकरून कांद्याच्या पाण्यात सगळे साहित्य एकजीव होईल. नंतर तेल गरम करून भजी छान कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या. ही भजी तुम्ही चहा सोबत संध्याकाळच्या वेळी खाऊ शकता.

मूग डाळ भजी :
मूग डाळ आधी चार तास स्वच्छ धुऊन भिजत घालावी. तासानंतर मुगाची डाळ पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यावी. नंतर मुगाची डाळ मिक्सिंग बाऊल मध्ये घेऊन त्यात मीठ, जीरं पावडर, तिखट, हळद घालून पाच मिनिटं फेटून घ्यावी. त्यामुळे भजी मस्त गोल गोल फुगते, आतून हलकी वरून कुरकुरीत होते आणि खुशखुशीत ही लागते. गरम तेलामध्ये भजीचे पीठ सोडून छोट्या गोल गोल मुग डाळ भजी सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. सॉस किंवा चटणी सोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता.

बटाटा भजी :
बटाटे सगळ्यांच्याच घरात नेहमी उपलब्ध असतात. बटाटे सोलून पातळ चकत्या करून साध्या पाण्यात साधारण २० मिनिटे घालून ठेवावेत. बटाट्याच्या चकत्या पाण्यात भिजताहेत तोवर एका मध्यम वाडग्यात बेसन तांदूळ पिठ एकत्र करून त्यात ३ ते ४ टेस्पून पाणी घालून पिठ भिजवावे. त्यात जिरे, मिठ आणि सोडा घालून मिक्स करावे. नंतर एका कढईत तेल तापत ठेवावे. बटाट्याच्या चकत्या २ मिनिटं आधी पाण्यातून  उपसून काढाव्यात, म्हणजे बटाट्यावरचे एक्स्ट्रा पाणी भिजवलेल्या पिठात जाऊन पिठ अजून पातळ होणार नाही. तेल तापले कि बटाट्याच्या चकत्या पिठात बुडवून भजी तळून काढाव्यात. नंतर गरमागरम भजी तुम्ही सर्व्ह करू