भारंगीची भाजी रानभाजी
पूर्वा सावंत

भारंगी हि एक रानभाजी आहे. हि भाजी फक्त पावसाळ्यातच बाजारात येते.

साहित्य:
भारंगीची पाने- २ वाटे (चिरून अंदाजे २ कप)
वाल किंवा पावटे – १/४ कप
कांदा,चिरून – १ मध्यम आकाराचा
लसूण पाकळ्या, ठेचून – ६ ते ८
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
घरगुती मसाला किंव्हा मिरची पावडर- २ टीस्पून
तेल- ३ ते ५ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून (ऐच्छिक )

कृती:
आदल्या दिवशी रात्री, वाल/पावटे स्वच्छ धूऊन पाण्यात भिजत घालावेत.
प्रथम पाने व्यवस्तीत धुऊन घ्यावीत . फार बारीक चिरू नयेत किंव्हा हाताने तोडून घ्यावीत .
चिरलेली पाने व भिजवलेले वाल एकत्र करून कुकरमध्ये तीन शिट्या काढून उकडून घ्यावेत.
एका पँन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात हळद, हिंग व मसाला टाकून परतून घ्या. मीठ व उकडलेली भाजी पिळून त्यात टाका. भाजी फार घट्ट पिळू नका नाहीतर भाजी खूपच कोरडी होइल.
छान एकत्र करून झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.
भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत गरमागरम वाढा.

दुसरी पद्धत :
भाजी कापून उकडून घ्या . तेलावर कांदा, लसुन आणि ४-५ लाल सुक्या मिरच्या तोडून टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात उकडलेली भाजी पिळून टाका. मीठ टाकून भाजी परतून घ्या. झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.

वालाच्या एवजी छोट्या लाल चवळ्या वापरू शकता.

 

 

 

 

दिंड्याची भाजी रानभाजी

दिंडे किंवा दिंडा या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात.
हि भाजी म्हणजे पावसात उगवणाऱ्या एका वनस्पतीची देठ असतात. यातही दोन प्रकार येतात. काही दिंड्यांची देठ हिरवी तर काहींची लाल असतात.
हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

सौजन्य: प्राजक्ता म्हात्रे
खाण्यासाठी जन्म आपला
# पध्दत १ (वाल घालून)

साहित्य:
दिंडे – १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
मोड आणून सोललेले वाल- १/२ कप
चिरलेला कांदा- १/२ कप
ठेचलेल्या लसूण पाकळ्या – ६
राई/ मोहरी- १ टीस्पून
जिरे- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला – २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+गोडा मसाला- १ टीस्पून)
गूळ- १/४ टीस्पून