एनर्जी लाडू
भीम का लड्डू
अतिशय पौष्टिक आणि ताकद देणारे लाडू
करुन पहावे असेच
याने तुमच्या शरीरातील अशक्तपणा भरुन निघेल…आकाराला लहानच करायचे..आणि वरुन दूध प्यायले तर अतिउत्तम
यासाठी साहित्य घेतलेलं आहे
तेलबिया:- अक्रोड, बदाम, सूर्यफूल बी ,मगज बी, पिस्ता, काळे तीळ, खारीक पूड.. साधारणपणे सर्व पाव पाव वाटी
डिंक अर्धी वाटी, किसलेलं सुकं खोबरं दोन वाट्या,एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ,दिड वाटी गूळ आणि आवश्यक तितके तूप.
कढईमध्ये अक्रोड बदाम पिस्ता आधी कोरडे भाजून घ्या. नंतर सूर्यफूल बी, मगज बी ,काळे तीळ हे भाजून घ्यायचं.
नंतर कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये खारीक पूड भाजून घ्यायची.
सुकं खोबरं कोरडच खमंग भाजून घ्यायचं.
डिंक तुपामध्ये फुलवून घ्यायचा आणि एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ आणि एक वाटी गव्हाचे पीठ आवश्यक तितक्या तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचं.
नंतर सर्व एकत्र करून दिड वाटी गूळ किंवा गूळ पावडर घालून एकत्र करा…आणि मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्या…सुपारी पेक्षा थोडे मोठे अशा आकारात लाडू वळा…तयार आहेत आपले एनर्जी लाडू.