.
#corona# quarantine# stay home stay safe# वेळेचा सदुपयोग#learn by fun#हसत खेळत शिक्षण
गावाकडे सुट्टीला आल्यानंतर दिवसभर कामे केल्यानंतर वेगळे काहीतरी करु, म्हणून घर स्वच्छ करताना चार वर्षांपूर्वी ट्रॅक्टर ची ट्रॉली रंगविण्यासाठी आणलेले रंग पाहिले .आणि अापण ट्रॉली ल रंग देऊ असे ठरवले पण कधीच असा रंग दिलेला नाही, शिवाय जुने रंग थोडे खराब झालेले त्यासाठी चांगले ब्रश ही नाहीत पण पाहू देऊ म्हणून अपुऱ्या साहित्य ने सुरुवात केली .थोडी उन उतरल्यावर रंग द्याय चा म्हणून ४वाजता ट्रॉली स्वच्छ करून घेतली आणि सफेद रंग आर्य आणि मी द्यायला घेतला तो पहिला हात देताना मजा येत होती पण खूप च वेळ गेला पण पूर्ण रंग होत असतानाच पावसाचे थेंब पडू लागले आणि आम्हाला उगीच भीती वाटली येवढा वेळ फुकट जातो की काय ?पण पाऊस पडलाच नाही आणि हायसे वाटले . .
मोठे काम केल्यासारखे सारखे ट्रॉली पहविसी वाटत होत
दुसऱ्या दिवशी पुन्हा ४वाजता सुरू केले आणि लाल रंग दिला . .
त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा लाल च दुसरा हात दिला आता पूर्ण ट्रॉली लाल झाल्यावर ट्रॉली तर झाली पण अजुन जरा confidence आल्यामुळे काहीतरी चित्र काढू असे ठरले व सोपी चित्र म्हणून वारली चित्रं काढू .
मी
काल प्रथम बैलगाडी काढली आणि आर्य लाही आपल्याला चित्र जमू शकतील. असे वाटल्याने त्यानेही जी चित्र काढण्यास सुरुवात केली ती फास्ट आणि नॉनस्टॉप चालू झाले इतके विषय त्याने हाताळणे की बस. . अनेक कल्पनांना भरारी मिळून चित्र काढली आहेत. . फारच मज्जा आली ट्रॉली रंगविण्यात. .
रंग देण्याचे काम तर झालेच पण वारली चित्रा मुळे ट्रॉली खूपच आकर्षक ही वाटू लागली आहे.