तुम्ही बदलू शकता

सकारात्मक बदलाची ५० सूत्रे

लेखक: शिवराज गोर्ले

मूल्य २५०₹ टपाल ३५₹ एकूण २८५₹

 

तुम्ही बदलू शकता… थोडं स्वतःला, थोडं जगाला.

स्वतःला का बदलायचं? तर इतरांना आपण बदलू शकत नाही म्हणून! थोडं का बदलायचं – तर तेवढेच शक्य असतं म्हणून.

बदल तर आवश्यक असतोच.

आपल्या प्रत्येकाचा व्यक्तिमत्वात काही गुण असतात काही दोष. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर गुणांची बेरीज करावी लागते – दोषांची वजाबाकी. थोडक्यात, स्वतःला बदलावं लागतं.

आणखीन एक – काळ तो सतत बदलत असतो. असं म्हणतात बदल हाच तर जगाचा स्थायीभाव असतो.

साहजिकच काळानुसारही स्वतःत काही बदल करावे लागतात. जे बदलत नाहीत, ते आहेत तिथेच राहतात…. किंबहुना काळाच्या प्रवाहात मागे फेकले जातात.

तात्पर्य, बदल अपरिहार्य असतो. वृत्तीत…. विचारात आणि कृतीतही. आणि गंमत अशी की तुम्ही बदललात की तुमच्या अवतीभवतीचं जगही बदलतं… थोडं थोडं. आख्खं जग बदलण कोणालाच शक्य नसतं. केवढ्या अक्राळविक्राळ समस्या आहेत; पण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी खूप काही होऊ शकतं.

होय आपण बदलू शकतो. असं बराक ओबामांनी आव्हान केलं आणि अमेरिकनं इतिहास घडवला. बदल हाच आजच्या जगाचा पासवर्ड आहे. बदलाचं बीज आपल्या प्रत्येकात असतं….. ते फुलवावं लागतं एवढच. बदलणं अवघड वाटलं तरी अशक्य नसतं.

ते शक्य कसं करावं याची साधी सोपी ५० सूत्रं इथे दिली आहेत.

‘ व्यक्तिमत्त्व विकास ‘ हा आज परवलीचा शब्द झाला आहे . पण व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बहिरंग नव्हे , खरा विकास हा ‘ आतून ‘ व्हावा लागतो . त्यासाठी स्वतःत काही बदल घड वावा लागतो . कसा घड वायचा हा बदल ? त्याचीच तर ही साधी , सोपी सूत्रं आहेत . पहिलंच सूत्र घ्या – ‘ प्रतिक्रिया नको , प्रतिसाद द्या ‘ . तुम्ही स्वतः जेव्हा प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देऊ लागता तेव्हा समोरचेही तुम्हाला प्रतिसादच देऊ लागतात . मग बघता बघता सगळंच बदलू लागतं , – तुम्ही … तुमचं व्यक्तिमत्त्व … तुमचा परिसर ! जगणं समृद्ध व्हावं … जग सुंदर व्हावं असं अगदी मनापासून वाट त असेल तर त्यासाठीचा हाच ‘ गुरुमंत्र ‘ आहे तुम्ही बदला … जग बदलेल !