मुलं किती निष्पाप असतात 🥰 परवा आमच्याकडे पसारा या विषयावर गप्पा चालू होत्या.. मी मुलींना सांगत होते की, आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं की, तिन्हीसांजेला घर आवरून, हातपाय स्वच्छ धुवून देवापुढे दिवा लावतात त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं आणि घरी लक्ष्मी येते 😊 !! मग लक्ष्मी कोण ? ती कशाची देवता आहे ? वगैरे गप्पा झाल्या. देवताळेपणा म्हणून नाही तर त्यानिमित्ताने त्यांना नीटनेटकेपणा, स्वच्छ्ता, वाणी शुध्द होण्यासाठी श्लोक, स्तोत्र म्हणणे यात काहीच गैर नाही. त्याला कर्मठपणा, रूढी, परंपरा वगैरे ची जोड देण्याचा अट्टाहास तर मुळीच नाही. असो, मुद्दा असा की हे सगळं बोलणं झालं आणि आम्ही आपापल्या कामाला लागलो.
काल सकाळपासून अचानक आम्ही जुन्या बाहुल्यांना paint करू का? असं टुमणं सुरू झालं; म्हटलं करा! मग बाहुल्या नटवून झाल्या..मग हळदीकुंकू मागण्यात आलं 😄 आणि आम्हाला बघायला बंदी होती 😉 विचार केला जाऊदे कळेलच नंतर!! मग भेंडीची देठ हळूच नेण्यात आली.. डबी मध्ये पाणी नेण्यात आलं , ओढणी नेण्यात आली, केरसुणी आणि सुपली चा आवाज येऊ लागला !!! आता मात्र मला उत्सुकता वाटायला लागली.. चाललंय तरी काय ?!!! सगळी आरास झाल्यावर मग बोलावण्यात आलं आणि खुलासा झाला की, ‘ तिन्ही ‘ म्हणजे तीन असं समजण्यात आलंय आणि ‘ सांजा ‘ म्हणजे ‘ देव्या ‘ 🤭😘 !!! म्हणून मग या तीन देवींची ; अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांची प्रतिष्ठापना झाली !! त्यांच्या खाण्यापिण्याची सोयही केली गेली आणि प्रसन्न करण्यासाठी मंत्रही लिहिण्यात आला 🥰 !!! त्यांना देण्यात आलेले रंगही विचारपूर्वक निवडले होते..म्हणजे लक्ष्मी धनसंपत्ती ची देवता म्हणून तिला सोनेरी रंग वगैरे 😇 !!! अजूनही बरेच specifications सांगितले पण मला मूळात अप्रूप या गोष्टीचं वाटलं की, आपण एखादी गोष्ट मुलांना सांगतो; तेव्हा कल्पनाही करू शकणार नाही अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात येतात आणि मोकळीक दिली तर त्या अशा सुंदर प्रकारे आपल्या समोरही येतात !!! मुक्तखेळ खरंच खूप महत्त्वाचा आहे मुलांसाठी…त्यातूनच त्यांची कल्पकता आणि सर्जनशीलता विकसित होत असते. पसारा नको, हे कशाला हवंय – ते कशाला घेताय?, बाहुल्या रंगवायची काय गरज आहे? अंगाला आणि कपड्यांना रंग लागून वाट लावू नका? असे प्रश्न न विचारता थोडं त्यांच्या मनाप्रमाणे करू दिलं की मुलं अशी छान surprises देतात आपल्याला 🤩 आमच्याकडे सध्या संध्याकाळी घर आवरून निरपेक्षपणे या तिन्ही देवतांना नवीन खाऊ आणि पाणी ठेवून खुश करणे आणि स्वतः खुश होणे हीच पूजा आहे 🥰 !!! Selfless Parenting