लहान मुलांना सहज प्रश्न विचारतात मोठेपणी तू काय होणार ?

हे खरंच असं विचारणं कितपत योग्य आहे?

बऱ्याचदा लहान मुलांवर मोठ्या लोकांच्या अतृप्त इच्छा लादल्या जातात. आपल्याला जे करता आले नाही ते तू कर सांगितले जाते. किंवा पालकांनाही निट समजत नसतय कि आपले मुल नक्की काय करायला जन्माला आलय तर त्या मुलाला काय समजणार डोंबल ?
मोठ्यांच निम्म लाईफ संपते तरी समजत नाही तर लहान मुलांना आपण कोणीतरी काय व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं ? हे खरंच माहिती असतं का ?

मला वाटतं त्यांना ते समजत नाही . तुम्हाला तरी माहिती होतं का हो लहानपणी की मोठेपणी तुम्ही काय होणार ? पण तरी आपण लहान मुलांना विचारत राहतो तू मोठेपणी कोण होणार ?

मध्ये एका नातेवाईकाच्या लग्नाला माझी पुतणी पुण्यात येऊन गेली. त्यानंतर आजच पहिल्यांदा फोनवर माझ्याशी बोलली. तिला बऱ्याच लोकांनी लग्न मंडपात विचारलं की तू मोठेपणी कोण होणार ? तिने सांगितलं मी अजून काही ठरवलं नाही . खरं सांगितलं तिने .

पण आता तिला प्रश्न पडला आहे की आपण नक्की काय व्हायचं ? मला वाटतं आपण आत्ताच तिला मोठेपणी तू अमुक हो . तमुक हो अस काही सांगणे हे चुकीचे आहे.

मी तिला म्हणालो , “की बाबा , आई जे काही झालेत त्यातुन रोज काम करताना ते काय काय करतात ? कुठले त्यांचे गुण / स्किल्स त्यांना उपयोगी पडतात ? याची यादी एका सेल्फ एन्यालिसिस नावाच्या वहित लिहुन काढ .”

“त्याच वहित तुझ्या आवडीनिवडी काय आहेत ? ते लिहून ठेव. उदाहरणार्थ तुला कुत्र्याशी खेळायला आवडते. ड्रॉइंग आवडते. टिचर टिचर खेळायला आवडते . पोहायला आवडते . स्ट्रेंजर्स लोकांशी बोलायला आवडते . स्टेजवर तुला भिती वाटत नाही मला वाटते बाबा अजुनही स्टेजची भिती ! मग तू माझ्या पेक्षा चांगली मिटिंग मोठेपणी घेऊ शकणार .

कस असतय ? तुमच प्रोफेशन म्हणजे एक इंजिनिअर , डॉक्टर अस एक काहिही झाले तरी ते एकच एक अस ठोस काही प्रोफेशन नसते . तो एक ‘स्किल सेट’ असतो .

इंजिनिअर बाबा असला तरी तो रोज पैसे कमवायला काय करतो ? ड्रायव्हिंग करत साईटवर , साउंड स्टुडिओत जातो . म्हणजेच तुला इंजिनिअर व्हायच तर ड्रायव्हिंग चांगले यायला हवे . ट्राफिक रूल्स माहिती हवे . मग ही ड्रायव्हिंग स्किल्स मला चांगली शिकायचीयत हे वहित लिहुन ठेव. मग काय करतो ? तिथे जाऊन विवीध लोकांशी विवीध भाषेत बोलतो . म्हणजे तुला अनोळखी लोकांशी चांगले बोलता आलं पाहिजे. त्यासाठी विविध भाषेवर प्रभुत्व हवे . त्या भाषा समजायला नीट बोलता यायला हव्या .
अस काय काय तुला बारिक सारिक शिकायला हव ? त्या स्किलसची यादी करत त्यावर काम करायला सुरवात कर .
तू लहानपणी जे स्किलस शिकती आहेस ती युनिक स्किल्सच तुला तू कोण बनणार ? हे शालेय अभ्यासा बरोबरच पुढे मार्ग दाखवतील .

जगात सर्व आपण ठरऊ तसच होत नसते. डेस्टिनी , नशिब नावाची चिज , भेटणारी माणसही आपण काय बनायच व आपल्याकडुन काय काम करून घ्यायचे ? हे ठरवत असतात .

त्या कारणांनी आपण फालतू छातीठोक पणे मी अमुक तमुक बनणार सांगण्या पेक्षा अस सांगावे की मी कोणीही बनले तरी मी लहान लहान स्किल सेटस शिकतीय त्याचा एकत्र उपयोग करून घेणारी एक चांगली व्यक्ती बनायचय अस ठरवलय .

आत्ताच मी कस सांगू की मी डॉक्टर.होणार का व्हेटर्नरी डॉक्टर का फार्मसिस्ट का इंजिनिअर होणार ?

मी एक चांगली स्किलफुल आनंदी , समाधानी व्यक्ती बनणार हे नक्की . अस स्वत:च्या मनाला व लोकांनी विचारले तर त्यांना सांगत जा . ”

पुतणीला माझ म्हणणे समजलय .
ती मोठेपणी कोणिही बनो ,
ती मोठेपणी आनंदी व समाधानी होणार .
आमेन ! तथास्थु !!

😊 तुल मुळे.
#अतुलमुळे_स्किलfool
#अतुलमुळे_स्किलफुल