मुलांचा अभ्यास करून घेण्याविषयी मार्गदर्शन
भाग-१

मारुन अभ्यास कधीच घेवू नका त्यातून जो मानसिक धका बसतो त्यामुळे अभ्यास हा केवळ काहीतरी पुर्ण करायचे आहे असाच केला जातो त्यात कधीच आवड निर्माण होऊ शकणार नाही.
छ्डी वाजे छमछम आणि विद्या येई घमघम हा निव्वळ घोकमपट्टीचा भाग आहे. प्रत्यक्षात डोक्यात काही शिरेलच असे नाही.
साधारण ४ ते १० वर्षापर्येंत मुलांना अभ्यासाची गोडी थोड्या उशीरानेच लागते त्यात पालकांचा आणि शिक्षकांचा सकारात्मक संवाद अपेक्षित असतो. या वयात मुले कविता किंवा गाणी असे सहज बडबडतात पण घोड पेंड खाते ते लिहायच्या वेळी. त्यात प्रामुख्याने तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे वेळ लागणे, हात दुखणे आणि अभ्यासाच्या
वेळी इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध असणे ही कारणे देता येतील.
मुलांच्या हातात पेन्सिल किंवा पेन बसावा यासाठी मातीची खेळणी करायला देणे , पीठाच्या वस्तू बनविणे असे काही प्रकार करावेत ( हे सर्व शाळांमध्ये होत असले तरी घरी पुन्हा पुन्हा करावे).
बहुतांशी मुलांना जो अभ्यास करायचा आहे तो येत असतो मात्र तेच तेच पुन्हा पुन्हा लिहायचा ते कंटाळा करतात.
उदा तुम्ही त्यांना १,२,३,४ लिहायला सांगितले तर ते आवडीने लिहितील पण फक्त १ हा अंक १० वेळा लिहायला सांगितला तर ते लिहणार नाहीत.
प्रथम त्यांची सायकोलॉजी समजून घ्या
त्यांना खेळणी प्रिय असतील तर खेळणी घेवून अभ्यासाला बसा तुम्हीही ती खेळणी खेळा आणि खेळता खेळता जसे आपण त्यांना घास भरवायचो तसाच अभ्यास घ्या , त्यासाठी तुम्हालाही काही काळ मूल व्हावे लागेल ते व्हा.
शक्य असल्यास त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये त्यांना बसवून अभ्यास करायला सांगा , (इट वर्क )
ज्या दिवशी पुर्ण होमवर्क केला गेला त्या दिवशी आवर्जून मुलांचे कौतूक करा.
उच्चार सुधारण्यासाठी त्याच्याच आवडीची गाणी कविता, प्रार्थना हे मोठ्याने वदवून घ्या . होम वर्क अपुर्ण असणे म्हणजे त्याला येत नाही असे मुळीच नाही जरा आवड निर्माण झाली कि होईल सुरळीत सगळे.