पालकांसाठी …

१ ) आपला मुलगा /मुलगी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या वाईट मार्गाला जावू नये ..व्यसनाधीन होऊ नये अशी सर्वच पालकांची इच्छा असते ..ही इच्छा साकार होण्यासाठी पालकांनी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे ..आपण जर कोणत्याही प्रकारचे व्यसन करत असू तर मुले त्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते …

२ ) साधारणपणे मुले बिघडण्याची अंशतः सुरवात इयत्ता आठवी पासून होऊ शकते ..तेव्हा पासूनच मुलांकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरवात करा ..त्यांचा आभ्यास ..त्यांचे मित्र ..त्यांचे खेळ ..या बद्दल ची माहिती घेत रहा..आपल्या व्यस्त रुटीन मधून त्यांच्या साठी वेळ द्या ..त्यांना बोलते करा ..

३ ) वयाने मोठ्या असलेल्या मुलांमध्ये आपला मुलगा किवा मुलगी जास्त वावरत असेल तर त्या बाबत सावधगिरी बाळगा ..ते वयाने मोठे असलेले मित्र मिवा मैत्रिणी कशा प्रवृत्तीचे आहेत ..काय करतात ..त्यांचे पालक काय करतात ..या बद्दलची माहिती मिळवा ..

४ ) मुलांसमोर पत्नी -पत्नी ने टोकाचे भांडण टाळावे ..शिवीगाळ ..मारहाण आरोप -प्रत्यारोप करणे टाळावे ..या वयातील मुले फार संवेदनशील असतात ..

५ ) मुलांना पॅाकेट मनी म्हणून जास्त पैसे देवू नका ..दिलेल्या पैश्याचे त्यांनी काय केले हा हिशेब घ्यायला विसरू नका ..मुलांना सतत बाहेरचे..हॉटेलचे खाण्याची सवय लागू देवू नका ..मुलांना स्वतंत्र बेडरुम असेल तर तर बेडरूमचे दार उघडे ठेवले जाईल याची काळजी घ्या ..

६ ) मुले जास्त वेळ एकांतात घालवत असली किवा टीव्ही ..गेम या मध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असली ..तर त्यांच्याशी बोला ..त्यांच्या समस्यांची माहिती घ्या ..जाऊ दे आपल्याला त्रास तर देत नाही ना या विचाराने त्यांच्या कडे दुर्लक्ष करू नका ..

७ ) या वयातील मुलांना जास्त वेळा घरात एकटे ठेवून किवा नोकरांच्या भरवश्यावर ठेवून आई वडिलांनी बाहेर पार्ट्यांना जाणे टाळले पाहिजे ..

८ ) मुलांनी वाहन चालवण्याचे कायदेशीर वय पूर्ण केल्याखेरीज त्यांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना दुचाकी अथवा चारचाकी हाती देवू नका ..

९ ) आपल्या म्हातारपणी मुलांनी आपली काळजी घेतली पाहिजे ..आपल्या सोबत राहिले पाहिजे ..आपल्याबद्दल योग्य आदर बाळगला पाहिजे असे वाटत असेल तर ..आपणही आत्तापासून त्यांचा आदर करा ..त्यांना सारखे हिडीसफिडीस करणे टाळा..त्यांची काळजी घ्या ..

१० ) मुले आणि पालक यांच्या संबंधात योग्य अंतर असू द्या …त्यांना मर्यादित स्वातंत्र्य द्या..कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक त्यांना कळत नाही …योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत करा …आपली मते त्यांच्यावर न लादता ..त्यांना आपली मते पटवून द्या ..त्यांच्या निर्णयातील धोके त्यांना समजावून सांगा ..

तुषार नातू

 

.मैत्री व्यसनमुक्ती केंद्र .