डिलिव्हरी झाल्यावर पहिल्या तासात बाळाला breastfeeding दयावे
त्यानंतर बाळ बरेच दा झोपी जाते .
बाळाचे “feeding cues ” असतात .ह्याचा अर्थ बाळा ला भूक लागल्यावर काही सिग्नल्स देत असते त्याला फीडिंग cues म्हणतात ,ते काय असतात ते मी आता सांगते .
2.
Head turning to look for breast _ डोके एकबाजूला वळवून स्तनाचा शोध घेणे
3.
Hand and fist moving to mouth _ हात आणि मूठ तोंडात घालायचा प्रयत्न करणे
4.
Becoming more alert and active _ बाळ सतर्क होते आणि हालचाल करायला लागते
5
Opening and closing of mouth _ तोंडाची उघडझाप करणे
हे सर्व आपल्याला लक्ष्यात आणून देतात की ,बाळ आता दूध पिण्यासाठी आसुसले आहे ,ह्या वेळेत लवकर त्याला आईने जवळ घ्यायला हवे आणि पाजायला हवे ,असे न झाल्यास मग शेवटचा उपाय म्हणजे बाळ जोरजोरात रडायला लागते ,तेव्हा मात्र शांत करून पाजायला घेणे कठीण जाते .
म्हणून ह्या feeding cues लवकर लक्ष्यात यायला हव्यात आणि त्या क्षणी बाळाला पाजायला घ्यायला हवं !
आता ह्या झाल्या बाळाच्या भुकेच्या सिग्नल्स !
आता बाळाची दूध पिण्याची पहिल्या आठवड्यातील क्षमता बघुयात!
बाळाची tummy size ही पहिल्या दिवसापासून हळू हळू वाढत असते
Day 1,
एका द्राक्षा एवढा
5ते 7 ml , एक ते दीड चहाचा चमचा
Day 3 .
एका लहान जांभळा एवढा 22 ते 27 ml
एक ते दीड टेबल स्पून
Day 7 .
एका टोमॅटो एवढा
45 ते 60 ml
1 महिना ..
एका मोठ्या अंड्या एवढा
80 ते 150 ml
ह्या प्रमाणात बाळाच्या पोटाची capacity वाढत जाते , म्हणून पहिल्याच दिवशी आईला दूध नाही म्हणून बाटलीभर वरचे दूध देणे किती चुकीचे आहे ते तुम्हाला कळेल 
पहिल्या दिवशी बाळ सारखे झोपत असते आणि फक्त चमचाभर पहिला चीक ( colostrum) बाळाला पुरतो
हे लक्षात घ्या
Babies day out of womb 


Day1
Birthday Nap झोपून राहतो नुसता 
Day2
Learning Day दूध प्यायला शिकणे 
Day 3
All day Buffet दिवस भर नुसते पितच राहणे 
( आईला ला खरे आईपण कसे कठीण आहे त्याची झलक येते
पण घाबरू नका ,तुम्हाला मदत करायला डॉक्टर आहेत ,कुटुंबीय आहेत )
Day 4/5
Night owl
घुबडाचे जीवन 

रात्रीची जागरणे ,बाळ दिवसा झोपते आणि रात्री जगावते 

Discharge झाल्यावर घरी पाहिले काही दिवस 

Dr कल्पना सांगळे
Breastfeeding series 3