Breast feeding series no 6

पाहिले 10 दिवस हे बाळासाठी आणि आईसाठी अनेक नव्या गोष्टी शिकण्याचे असतात .आई जशी खूप दिव्यातून गेलेली असते ( डिलिव्हरी / सीजर , त्यानंतर चे टाके दुखणे , थकवा , वगैरे ) त्याच प्रमाणे ,आईच्या गर्भाशयात नऊ महिने आरामात राहिलेले बाळ ,अचानक एके दिवशी त्या आरामाच्या जागेतून बाहेर आलेले असते .👶🏻☺️

दोघांसाठी हा कठीण समय असतो 😊
पण पुन्हा सांगते ,घाबरून ,गांगरून जायचे नाही ! डॉक्टर्स , फॅमिली , बाळाचे बाबा , नर्सेस आपल्या मदतीला असतात .पहिल्या दहा दिवसांत आई आणि बाळाची गाडी बऱ्यापैकी रुळावर ह्यांच्या मदतीने येणार असते .इथे आईच्या पेशन्स ची परीक्षा असते . 😊 ती व्यवस्थित पार पडली की पुढे खूप गोष्टी सोप्या होणार असतात .

आजच्या पोस्ट मध्ये पहिल्या 5 दिवसात बाळाच्या संडास मध्ये होणारे बदल पाहुयात .हे बदल बाळाला दूध मिळत आहे ह्याचे इंडिकेटर असतात

Day 1 👶 पाहिले 24 तास

🍓 किमान 1 दा लघवी
🍒 किमान 1 दा संडास
एकदम काळी काळी शी

Day 2 👶 24 ते 48 तास

🍓 किमान 2 वेळ लघवी
🍒किमान 2 वेळ संडास

काळी किंवा हिरवट काळी संडास

Day 3,👶 48 ते 72 तास

🍓किमान 3 वेळ लघवी
🍒 किमान 3 वेळ संडास

चॉकलेटी हिरवी पिवळी शी

Day 4आणि 5 👶 72 ते 120 तास

🍓किमान 4 वेळा लघवी ,चौथ्या दिवशी आणि 5 किंवा जास्त वेळा लघवी पाचव्या दिवशी
🍒 किमान 4 वेळा संडास

पिवळी ,पातळ ,आणि seedy शी ( मिरची च्या बियांप्रमाणे पिवळ्या रंगात ही seedy शी दिसते )

त्यानंतर जसजसे दूध यायला लागते ,शी च्या consistancy मध्ये बदल व्हायला लागतात ,त्याही नंतर काही बाळे दिवसातून 17 पेक्ष्या जास्त वेळा शी करू शकतात ,काही बाळे 7 दिवसातून एकदा शी करू शकतात ,हे दोन्हीही नॉर्मल असते ☺️☺️

एक लक्षात ठेवा ,ही series पूर्णदिवसांच्या ,नॉर्मल वजनाच्या ,काहीही आजार नसलेल्या बाळांसाठी ची माहिती आहे !
काही आजार असल्यास आपल्या बालरोगतज्ञ यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घ्या ☺️☺️

Dr कल्पना सांगळे

#beingpediatrician

Breast feeding series 6