Breast feeding series no 7.

👶🏻👶🏻👶🏻👶🏻

प्रसूतीनंतर पहिल्या काही दिवसांत स्तनपानासाठी येणाऱ्या समस्या आज आपण पाहू

🛑 1. सदा भुकेलं बाळ
🤱🤱🤱🤱🤱

हे बाळ सदा प्यायला मागत असते ,एक एक तास पीत असले तरी त्याचे समाधान होत नाही , त्यामुळे आई दमून जाते ,व त्यामुळे तिची मानसिक व शारीरिक स्थिती बाळाला दूध पाजण्याची रहात नाही .असेच चालू राहिले तर lactation failure म्हणजे आईचे दूध पुरेसे न येणे होऊ शकते !

असे बरेचदा पुढील कारणांमुळे होते

1 🎈 बाळाला नीट पाजले जात नाही ,म्हणजे त्याची ग्रीप नीट नसते ,ते फक्त निप्पलला चोखत असते ,त्यामुळे दूध त्याच्या तोंडात येत नाही ,मग ते अजून जोरजोरात चोखायला लागते ,ज्यामुळे आईला वेदना होतात . बाळाची ग्रीप व्यवस्थित हवी ,त्याच्या हिरड्यांखाली areola हवा निप्पल नाही !

2 🎈
जर बाळ थोडा वेळ डाव्या स्तनावर आणि लगेच थोडा वेळ उजव्या स्तनावर घेतले तर बाळाला पातळ दूध मिळते ,त्यामुळे त्याची भूक भागली जात नाही ,म्हणून ते सारखे सारखे प्यायला बघत असते ,ह्यावर उपाय म्हणजे एक बाजू पूर्ण रिकामी ( अर्धा ते पाऊण तास ) होऊ दयावी मगच दुसऱ्या बाजूला घावे .

आई चा आणि बाळाचा स्किन to स्किन कॉन्टॅक्ट होणे गरजेचे आहे ,आईला धीर द्यावा आणि समजवावे की नीट ग्रीप आणि एक बाजू पूर्ण रिकामी होणे खुप महत्त्वाचे आहे !

🛑 2. सदा झोपणारे बाळ

नवीन जन्मलेले बाळ झोपून असते ,भूक लागली तर चुळबुळ करत आणि फीडिंग cues म्हणजे सिग्नल देत उठत असते ,जर बाळ नुसतेच झोपत असेल तर मात्र त्याला 2 तासांनी उठवून पाजायला घावे . बाळ जेव्हा आपले जन्मवेळाचे वजन ओलांडेल ( पाहिले 8/9 दिवस वजन कमी होते ,आणि साधारण 10/11 व्या दिवशी ते जन्मवेळाच्या वजनाला गाठते व नंतर ते वाढत जाते ) त्यानंतर नॉर्मल बाळाला on demand फीडिंग देऊ शकतो .

बाळ जर जास्त झोपत असेल आणि वजन वाढत नसेल तर मात्र ताबडतोब बाळाच्या डॉक्टरांना दाखवून घेणे .त्यांना विचारल्या शिवाय वरचे दूध देऊ नये !

🍼🚫🍼👎

🛑 3. चपटे ( आत ओढलेले ) निप्पल

निप्पल आत गेलेले असतील तर आधी सांगितल्या प्रमाणे 20 cc syringe चा प्रयोग बाळाला पाजण्या आधी करत जावे ,हळू हळू निप्पल बाहेर येते ,बाळाच्या चोखण्यामुळे पण काही दिवसात ते बाहेर येते .
ब्रेस्ट पंप पण ह्यासाठी उपयोगी आहे .

महत्वाचे : ह्यासाठी निप्पल shield नावाचा प्रकार अजिबात वापरू नये ! 🚫🚫👎👎

🛑3 दुखरे निप्पल ( sore nipple)

बऱ्याच आयांना हा त्रास जाणवतो . प्रथम प्रसूती असेल तर अधिकच !
पण एकदा का बाळाला नीट ग्रीप यायला लागली की काही दिवसांत हा त्रास हळू हळू कमी होतो.

कारणे :
1. बाळ निप्पल चोखत असेल तर .. areola हिरड्यांखाली येणे अपेक्षित

2. निप्पल ला सारखे सारखे स्वच्छ , पुसून काढले जात असेल तरी ही ते सेन्सिटिव्ह आणि दुखरे होते .अंघोळीच्या वेळेस ते स्वच्छ करावे आणि तेवढे बास असते नंतर सारखे सारखे पुसून काढत बसू नये !

3 fungal infection झाल्यास देखील निप्पल दुखू शकते ,ह्यासाठी डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे

बाळाच्या चावण्यामुळे जर जखम झाली तरीही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

🛑 4 Breast engorgement (दुखरे आणि जड झालेले स्तन )

स्तन अत्यंत कठीण आणि दुखरे झालेले असतात ,आईला ताप ,अशक्तपणा आलेला असतो .स्तनाची त्वचा लाल आणि गरम झालेली असते ,गाठी पण हाताला लागत असतात . असे झाल्यास दूध पाझरायला अटकाव होऊ शकतो .
असे होऊ नये ह्यासाठी डिलिव्हरी झाल्या झाल्या बाळाला पाजायला घ्यायला हवे, त्याचे ग्रीप नीट आहे की नाही ते बघायला हवे ,आणि एक स्तन पूर्ण रिकामा करून मगच दुसऱ्या स्तनाला बाळाला लावणे .
असे झालेच तर डॉक्टरांना दाखवून घेणे ,ब्रेस्ट massage ( पीठ मळतो तसे बेस पासून निप्पल पर्यंत मसाज करणे ) दूध पाजून झाल्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे जेणेकरून लालपणा कमी होतो .
आईने हाताने किंवा ब्रेस्ट पंप ने दूध काढून स्तन थोडे मऊ झाल्यावर पाजायला घेतले तर जास्त फायदा होतो .

🛑 5 .Primary lactation failure ( पहिल्यापासून दुधाचे प्रमाण शून्य किंवा अत्यल्प असणे )

ही अतिशय दुर्मिळ अशी स्थिती असते !

बहुदा ही ज्यांची प्रथम प्रसूती त्रासदायक , सिझेरियन डिलिव्हरी , जास्त वजन , जास्त वय , मधुमेह,आईला असलेले इतर दुर्धर आणि जुने आजार अश्यांमध्ये दिसून येते !

त्यामुळे पहिल्या 2 /3 आठवड्यात आपल्या बाळाला फक्त आईचे दूध देण्याचा मनापासून प्रयत्न केल्यास अनेक अडचणींवर आपल्याला मात करता येते ,व lactation failure पासून आपण आई ला आणि पर्यायाने बाळाला वाचवू शकतो ☺️☺️

Happy breast feeding 🥳🥳

Dr कल्पना सांगळे

#being_pediatrician