ह्या पोस्ट मध्ये आपण आईच्या दुधाचे transition म्हणजे ते कसे बदलत जाते ते पाहू
A . : चीक (Colostrum )
१ . गर्भारपणात तयार होणारे असते हे दूध
२. बाळाला मिळणारे पाहिले दूध
३. ह्यात जास्त प्रमाणात प्रथिने ,व्हिटॅमिन्स ,आणि मिनरल्स असतात
४. अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी त्यात antibodies खूप प्रमाणात असतात .
B . कोवळे दूध(Transitional milk )
१. चीक आणि परिपक्व दुधाचा हा मिलाप असतो
२. प्रथिने ,लॅक्टोज ,आणि फॅट्स ने परिपूर्ण असते .
३. पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात .
४. Antibodies देण्याचे काम हे करतच असते
C. परिपक्व दूध
१. कर्बोदके ,प्रथिने ,आणि फॅट्स ने परिपूर्ण
२. बाळाच्या वाढीसाठी आणि energy साठी आवश्यक असणारे nutrients ने भरपूर
३.बाळाच्या immune सिस्टिम ला मदत करणारे .
४. बाळाला पाण्याची कमतरता होऊ न देणारे ,त्याच बरोबर fluid electrolite balance ची काळजी घेणारे .
अजून गम्मत म्हणजे प्रत्येक आईचे दूध हे तिच्या बाळाच्या दृष्टीने बनते ,ही एक सातत्याने होणारी प्रोसेस आहे , जर बाळ अपुऱ्या वजनाचे ,कमी दिवस भरलेले असेल तर ,त्याच्यात ज्या गोष्टींची कमतरता आहे ,त्या गोष्टींनी त्याच्या आईचे दूध आपोआप परिपूर्ण होते
थोडक्यात कमी दिवसांच्या बाळाच्या आईचे दूध हे पूर्ण दिवस भरलेल्या बाळाच्या आईच्या दुधापेक्षा त्याच्या composition ने वेगळे असते
Fore milk : ( बाळ स्तनपान करायला लागल्यावर पहिल्या काही मिनिटांमध्ये येणारे दूध )
हे जरा पातळ असते ,पाण्याचे प्रमाण ह्यात जास्त असते ,बाळाची तहान मिटवायला हे कारणीभूत असते
Hind milk ( foremilk नंतर काही वेळाने येणारे दूध )
ह्यात फॅट्स आणि प्रथिने व कर्बोदके जास्त असतात ,जरा घट्ट असणारे हे दूध बाळाची भूक भागवते .
त्यामुळे बाळाला एक स्तन संपूर्णपणे रिकामा केल्यानंतर ,म्हणजे दोन्ही प्रकारचे दूध मिळाल्यानंतर च दुसऱ्या बाजूला प्यायला घ्यावे .घाई घाई ने 10 मिनिटे एका स्तनावर आणि 10 मिनिटे दुसऱ्या स्तनावर घेतल्याने बाळाला फक्त foremilk च मिळते ,तर असे करणे टाळावे .
आईचे दूध बनण्याची प्रक्रिया ही इतकी बेबी स्पेसिफिक आणि बेबी सेन्सिटिव्ह आहे ना की आपण कल्पना करू शकत नाही
समजा जर बाळाच्या शरीरात पाणी कमी झाले असेल तर मग ,त्याच्या तोंडातील mucosa म्हणजे जीभ टाळू आणि गालांच्या आतील आवरण कोरडे पडते .अश्या बाळाने जर आईचे दूध प्यायला घेतले तर हा कोरडेपणा आईचे निप्पल आणि aerola वरची स्किन बरोबर पकडते मेंदूला त्वरित सिग्नल जातो आणि त्याक्षणी जे दूध स्त्रवले जाते त्यात पाण्याचे प्रमाण वाढते
आता बोला ! ही इतकी sensitivity कुठल्या फॉर्म्युला feeding मध्ये आणि bottle feeding मध्ये आहे ? .
आईचे दूध हे गोल्ड स्टॅंडर्ड आहे बाळासाठी ते उगाच म्हटले जात नाही किंवा over hyped ही आहे असे नाही ! ते गोल्ड आहे आणि राहणारच
Dr कल्पना सांगळे
Breastfeeding series no 5