Breast feeding series no 4
😊😊😊😊😊
बाळाचे feeding cues लक्ष्यात येताच त्याला आईने लगेच जवळ घ्यावे .😊
बसून पाजत असेल तर पाठीला आधार घेत टेकून बसावे , बाळाच्या खाली उश्या घ्याव्या ,स्किन to स्किन कॉन्टॅक्ट झाला पाहिजे .बाळाचे पोट आणि आईचेपोट या मध्ये कुठला ही कपडा न येता ,एकमेकांना स्पर्श करत असावे .बाळाचे तापमान आणि हृदयाची गती असे केल्यामुळे नियंत्रित राहते ,बाळ शांत होते ,आई देखील मग थोडी रिलॅक्स होते . 😊😊

👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
बाळाने शांत होणे आणि आईने रिलॅक्स राहणे हे फीडिंग सुरू होण्यासाठी आत्यंतिक आवश्यक गोष्ट आहे 😊👍
👶🏻👩‍🦰
मग आई ने आपले निप्पल बाळाच्या गालाला आधी touch करावे 😊 जेणेकरून मग बाळ स्तनाच्या दिशेने डोके वळवेल ,त्यानंतर मग निप्पल ने बाळाच्या ओठांना स्पर्श केल्यास बाळ तोंड मोठे उघडून आपणच आपली मान जरा सरळ करून डोके थोडे मागे झुकवते . आईने मग अंगठा आणि तर्जनी ने निप्पल च्या आजूबाजूला जो काळा भाग असतो ( areola ) त्याच्या थोडे 2/3 mm वरती पकडून (कात्री चा होल्ड करून) संपूर्ण निप्पल आणि त्याच बरोबर जास्तीतजास्त areola हा बाळाच्या तोंडात जाईल असे हलके दाबून बाळाच्या तोंडात द्यावा .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ,कुठल्या ही परिस्थितीत ,निप्पल बाळाच्या हिरड्यांखाली आलेले नाही पाहिजे ,बाळाच्या हिरड्यांखाली areola यायला हवा ,नाहीतर मग निप्पल खूप दुखते ..😢
ह्या वेळेस बाळाच्या संपूर्ण शरीराला आधार द्यायला हवा ,फक्त डोके आणि मान नाही ! खाली मी माझ्या आधीच्या ब्रेस्ट feeding technique ची लिंक दिलेली आहे ती पण कृपया बघा .
पहिलटकरणीला सुरुवातीला कुणी जाणकार व्यक्तीने ह्या वेळेस मदत करावी ,एकदा का बाळाला प्यायला लागले आणि आईला देखील पाजायला नीट जमू लागले की मग त्यांना कुणाची गरज पडत नाही . 😇
सीजर झालेले असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी चे टाके दुखत असतील तर झोपून ,एका कुशीवर वळून पाजले तरी चालेल ,पण तेव्हा मात्र कुणीतरी अजून एक व्यक्ती मदतीला हवीच .
बाळ स्तनपान करू लागले की क्षणात आईच्या रक्तातील oxytocin नावाच्या संप्रेरकाची वाढ होते ,आणि milk let down होते म्हणजे आईला दूध सुटायला लागते 😊😊👍 हे जर डिलिव्हरी च्या पहिल्या तासात झाले तर खुप फायदा होतो . आईला जाणवण्या इतपत दूध चौथ्या दिवसापासून यायला लागेल जर वारंवार बाळाला प्यायला घेतले तर !
पण ,”पाहिले 3 /4 दिवस दूधच नसते आईला ,तर कशाला पाजायला घ्यायचे ? वरचे दूध आपण देऊ बाटलीने नाहीतर वाटी चमच्याने “असे केले तर मात्र , oxytocin मूळे सुरू होणारा दुधाचा flow येत नाही आणि मग ,आईला टेन्शन येते ! त्यामुळे स्ट्रेस येतो , आजूबाजूच्या बायका पण , ” हिला दूध आलेच नये डॉक्टर !” म्हणून गोंधळ घालतात व परत बाळाला वरचे दूध देत बसतात .ह्याचा एकत्रित परिणाम होऊन आईचे दूध पूर्णपणे आटून जाते आणि बिचाऱ्या बाळाला वरच्या दुधावर जगवले जाते😢😢
स्तनपान छान सुरू होण्यासाठी पाहिले 8 /10 दिवस अत्यंत महत्वाचे असतात ,आईचा पेशन्स बघणारे असतात ,हे आईने शांतपणे , टेन्शन न घेता पार पाडले तर नंतर येणारा काळ हा सुखाचा जातो .बाटलीने दूध पाजणे आता जरी आईला सोपे वाटत असेल तरी त्याचे परिणाम आणि नंतर होणारे त्रास हे आताच्या पाजतांना होणाऱ्या त्रासापेक्षा अनेकपट जास्त असतात ! हे कुणीच लक्ष्यात घेत नाही !
Dr कल्पना सांगळे
Breast feeding series no 4
ही लिंक पण बघा
👇👇