Breast feeding series no 2
गरोदरपणात वेळच्या वेळी केलेल्या आपल्या स्त्रीरोगतज्ञांच्या visits खूप महत्वाच्या असतात .आईचे वजन ,रक्ताचे प्रमाण , सोनोग्राफी ,काही रक्ताच्या गरजेच्या तपासण्या ह्याच्या बरोबरच एकदा पहिले गरोदरपण असलेल्या आईने आपले स्तन त्यांच्या कडून तपासून घ्यायला हवे ! काही स्त्रियांमध्ये स्तनाग्रे ( nipples) ही आत मध्ये वळलेली असतात / रुतून बसल्यासारखी ती stimulate केल्यावर टोकदार होत नाहीत ( inverted / retracted nipples ). असे काही असल्यास पुढे बाळाला स्तनपान करतांना प्रॉब्लेम येऊ शकतो .तुमच्या डॉक्टर तुम्हाला retracted nipples च्या ग्रेडिंग नुसार उपाय सांगू शकतात .जास्त retraction नसेल तर हलक्या बोटांनी रोज तेल लावून ते बाहेर ओढण्याचा व्यायाम ,किंवा 20 CC ची syringe वापरून एक vaccume pump तयार केला जातो ( त्याची माहिती मी या आधी एका स्तनपानाच्या व्हीडिओ मध्ये आधी दिलेली आहे ) तो वापरून स्तनाग्रे बाहेर खेचली जातात .
त्याच बरोबर रक्तवाढीच्या गोळ्या ,फॉलीक ऍसिड आणि calcium च्या गोळ्या घ्यायची टाळाटाळ करू नये ! तुमच्या शरीरातील लोह साठा शेवटच्या काही महिन्यात बाळाला मिळत असतो ,ज्याचा उपयोग बाळाच्या रक्त वाढीसाठी होणार असतो . ” आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?” ह्या म्हणी प्रमाणे जर आई मधेच रक्तक्षय ,Vit D ,calcium ,फॉलीक ऍसिड आणि इतर व्हिटॅमिन आणि मिनरल ची कमतरता असेल तर बाळ सुदृढ कसे होणार ?
ह्या सर्व गोष्टी स्तनपान व्यवस्थित सुरू होण्यासाठी ही मदतीच्या असतात !
नॉर्मल डिलिव्हरी / सीजर झाल्या नंतर ,बाळ जर पूर्ण दिवसांचे आणि नॉर्मल वजनाचे असल्यास ,ते पहिल्या 1 तासात स्तनपानासाठी तयार असते ते active असते ,अलर्ट असते ,रडत असते ,अशावेळेस nurse च्या मदतीने आईने पाठीवर झोपल्या झोपल्या त्याला पाजायचा प्रयत्न करायला हवा .हे अगदी सीजर झाल्यानंतर पण शक्य आहे ,आजकाल पूर्ण भूल दिली जात नाही ,OT मधेच बाळाला पाजायचा प्रयत्न व्हायला हवा .सुरुवातीचा चीक ( colostrum) बाळाच्या पोटात जाणे गरजेचे असते .बाळाने निप्पल आपल्या तोंडात घेतल्याने ,आईच्या शरीरात संप्रेरके ( हार्मोन्स ) स्त्रवली जातात ज्यामुळे दुधाचा flow सुरू व्हायला मदत होते . त्याच बरोबर आईचे bleeding कमी व्हायला ही हे मदत करते ,हे जर डिलिव्हरी नंतरच्या तासाभरात झाले तर त्याचा बाळाचे ब्रेस्ट फीडिंग establish व्हायला खूप मदत होते .तासाभराने मग बाळ झोपी जाते ,त्याचा अलर्टनेस जातो ,त्यानंतर त्याला छातीला लावणे अवघड जाते थोडक्यात तो स्वतःच नीट प्रयत्नशील राहत नाही .
खूप ठिकाणी हे तासाभरात बाळाला पाजण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही ! हे व्हायला हवे ,दूध काही खूप येत नाही फक्त 4 /5 थेंब पिवळा चिकट स्त्राव असतो ,पण तो बाळाला दिलाच गेला पाहिजे .बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्याचे गुण ह्या चीकात ( colostrum) असतात .
Breast feeding series 2
Dr कल्पना सांगळे
पुढील पोस्ट मध्ये
बाळाला दूध पाजण्याचे technique
Stay tunned
खाली IAP (इंडियन ऍकॅडमी ऑफ पेडियात्रीक) च्या site वर सीजर नंतर लगेच बाळाला ब्रेस्ट फीडिंग कसे करावे त्याची लिंक आहे .ती बघा