कोव्हीड काळात मुलांचे नुकसान झाले का?

कोव्हीड काळात मुलांचे नुकसान झाले का?

कोव्हीड काळात मुलांच्या शिक्षणाची प्रक्रिया बदलली होती. मात्र आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी कोव्हीड च्या आधीचीच शिकण्याची प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे.
कोविडच्या आधीची प्रक्रिया राबवताना, कोविड काळात मुलं खरंच शिकली का? हे मात्र कोव्हीडच्या आधीची मूल्यमापनाची पद्धत वापरून, परिमाणे वापरून तपासले जात आहेत!
कोव्हीड काळात जर आपण शिक्षणाची प्रक्रियाच बदलली होती तर जुनी परिमाणे जसं की पाढे येतात का? वाचन येते का? विज्ञानाचे प्रयोग करता येतात का? लावून त्या मुलाची गुणवत्ता कशी तपासता येईल? अशा प्रकारे गुणवत्ता तपासून आणि सारखं “कोव्हीड काळात मुलांच्या शिक्षणाचं फार नुकसान झालं हो” अशी वाक्य फेकून त्या मुलांचा शिकण्याविषयाचा आत्मविश्वास आपण कसा वाढवू शकू?

Read more

#pimpri science park

#pimprisciencepark
#scienceteacher
#fieldttrip
#sciencefun

पिंपरी सायन्स पार्क – नववी दहावीच्या कोणत्याही बोर्डच्या मुलांना पालक आणि विज्ञान शिक्षकांनी आवर्जून घेऊन जावे असे ठिकाण !!!
⚛️♻️♒

विज्ञान हा वर्गापेक्षा प्रयोगशाळेत आणि बाहेर फिरून पंचेंद्रियांना अनुभव देत शिकायचा विषय आहे. कारण विज्ञानाचा अभ्यास म्हणजे निसर्गाच्या नियमांचा अभ्यास. त्यासाठी निरीक्षण करायला हवे, चिकित्सक विचार करता यायला हवा. 🐒

Read more

“प्रबोधन ऐपावाक”

ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधन तर्फे सुट्टी समृद्ध करणारा विद्यार्थ्यांसाठीचा विशेष उपक्रम…

“प्रबोधन ऐपावाक”

(मराठी वाचू, समजू शकणाऱ्या ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी)

कोरोनाच्या काळात मागे पडलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणारा
‘ऐका-पाहा-वाचा-करा’ हा सुट्टीतील विशेष उपक्रम

कालावधी – १ ते ३१ मे २०२२
वर्गणी – रु. १००/- फक्त

उपक्रमाची खास वैशिष्ट्ये –
• ऐका, पाहा, वाचा यापैकी रोज १ लिंक
• ‘वाचा’चे साहित्य इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत पाठवले जाणार
• विशेष अनुभव देणाऱ्या रोज एक अशा एकूण २५ कृतींचा खजिना

Read more

ज्ञान प्रबोधिनी, छात्र प्रबोधन तर्फे सुट्टीतील मोफत उपक्रम

ज्ञान प्रबोधिनी, छात्र प्रबोधन तर्फे सुट्टीतील मोफत उपक्रम

साहित्याची आवड वाढवणारा व अभिव्यक्तीला चालना देणारा, सुट्टीतला ‘ऐका-पाहा-वाचा-करा’ मोफत उपक्रम
(मराठी वाचू, समजू शकणाऱ्या ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी)

कालावधी – १ ते ३१ मे २०२२
उपक्रमाची वैशिष्ट्ये –
• ऐका, पाहा, वाचा, करा यापैकी रोज १ लिंक
• त्यामध्ये दर्जेदार कथा, कविता, ललित लेख, माहितीपर, व्यक्तिविकसनपर लेख, विविध विषयांवरील चित्रफिती व कल्पक कृतींचा समावेश (सर्व साहित्य मराठीत)

Read more

ग्रामीण कृषी पर्यटन सहल निसर्ग- विज्ञान- शिबिर

(बालक पालकांसाठी)
🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳
उद्देश-
१)ग्रामीण जीवनाचा अनुभव घेणे.
२) जैवविविधतेचा अभ्यास करणे.
३) जंगल भ्रमंती , आकाश निरीक्षण , पक्षी निरीक्षण, इ. संधी उपलब्ध करून देणे.
४) सर्जनशीलता व कल्पकतेला चालना देणे.

शिबिर कोणासाठी:-
वय वर्ष १० ते १८ वर्ष

Read more

खेळणी

मुलं घरात आहेत तर त्यांना कसं रमवायचे पालकांना हा प्रश्न पडलेला आहे. मला वाटतं की पालकांनी मुलांना रमवायची जबाबदारी घेऊ नयेच. यामुळे पालकांचा ताण वाढतो आणि मुलं त्यांच्यावर अवलंबून राहायला लागतात.

मुलांना भरपूर वेस्ट सामान पुरवा. उदा. जुन्या ओढण्या, बेडशीट, पुठ्ठ्यांचे लहान मोठे बॉक्स, रद्दी, कात्र्या, वेगवेगळे दोरे

Read more