Back to Top

Category: khana khajana

पपईचे धपाटे

पपईचे धपाटे

🍒🍑🍐🥬🍏🍏
प्रत्येश लागणारा वेळ

३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
चांगल्या पिकलेल्या, गोड असलेल्या पपईचे तुकडे २ मोठया वाट्या
पाच सहा भाकरी होतील एवढे ज्वारीचे पीठ
२ चमचे डाळीचे पीठ
१ चमचा ओव्याची पूड
२-३ चमचे तीळ
१-२ चमचे धने जीरे पूड
हव्या त्या प्रमाणात तिखट
मीठ
हळद
आवडत असल्यास बारीक चिरून कोथिंबीर

क्रमवार पाककृती:
पपईच्या तुकड्यांचा मिक्सरमधे रस करून घ्या.
ज्वारीच्या पिठात सर्व जिन्नस मिसळून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. भिजवताना अजिबात पाणी घालायचे नाही.
भाकरीसारखेच पिठावर थापून घ्या.
भाजताना तव्यावर पीठ लावलेली बाजू येईल अशा पद्धतीनं टाका.
दोन्ही बाजूनं तेलाचा हात लावून भाजून घ्या.
खाताना बरोबर तूप, लोणी किंवा दही, ताक-दूध, दही-दूध घ्या. मिरचीचा ठेचा किंवा दाण्याची चटणी, जवसाची चटणी वगैरे बरोबर मस्त लागतो.

 

वाढणी/प्रमाण:
५ ते ६ मोठे धपाटे होतील.
अधिक टिपा:
भाजताना पाणी लावायचे नाही. तसेच थेट आचेवर न भाजता तव्यावरच भाजायचे.
धपाटे २-३ दिवस (भारतातल्या हवामानात) सहज टिकतात. इथे ४ दिवस तरी टिकायला हरकत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरीकांसाठी प्रवासाला जाताना खाण्याच्या पदार्थांसाठी उत्तम पर्याय आहे. लाल भोपळा घालूनही सुरेख होतात. पपई, भोपळा नसेल तर नुसता कच्चा मसाला, भरपूर तीळ, ओवा घालूनही छान होतात.

 नारळाच्या पोळ्या

नारळाच्या पोळ्या

🍒🥬🍎🫐🫐🍇🥦

प्रत्यक्षात लागणारा वेळ:

३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पारीसाठी:
१ मेझरींग कप कणिक, किंचीतसे मीठ, चमचाभर तेलाचे मोहन

सारणासाठी:

Read more

शेंगदाणा दही चटणी

शेंगदाणा दही चटणी

🥤🍶🍽️🍹🍸🍴🍹

 

शेंगदाणे हे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना शेंगदाणे आवडत नाही, ते त्यापासून बनवलेली शेंगदाण्याची दही चटणी खाऊ शकतात.

आवश्यक वस्तू-
भाजलेले शेंगदाणे – अर्धा कप,
दही – अर्धा कप,
हिरवी मिरची – दोन किंवा चवीनुसार,
जिरे – अर्धा टीस्पून,
तूप – एक टेस्पून,
साखर आणि मीठ – चवीप्रमाणे.

कसे बनवावे

Read more

व्हाईट सॉस

व्हाईट सॉस
🍐🍋🍒🥦🥬🍑🍑
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दूध १ कप
लोणी १ टेबलस्पून
मैदा १ टेबलस्पून

मीठ व मिरेपूड चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती:
लोणी गरम करून ते करपू न देता त्यावर मैदा परतायचा. फार नव्हे. रंग पालटता कामा नये पण मैदा भाजला गेला पाहिजे. त्यात हलक्या हाताने दूध घालायचे. गुठळ्या होऊ न देणे. झाल्यास त्या मोडून काढणे. तो लवकरच घट्ट होतो. उकळी आल्यावर गॅस बंद करणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालतात.

Read more

नारळाच्या पोळ्या

नारळाच्या पोळ्या

🍒🥬🍎🫐🫐🍇🥦
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पारीसाठी:
१ मेझरींग कप कणिक, किंचीतसे मीठ, चमचाभर तेलाचे मोहन

सारणासाठी:
१ मेझरींग कप खवलेला नारळ / नारळाचा चव
१ मेझरींग कप पंढरपुरी डाळ्याचे अगदी बारीक केलेले पीठ
३/४ मेझरींग कप पीठीसाखर
स्वादासाठी वेलची पूड, थोडे केशर

Read more

खमंग काकडी रायता..

खमंग काकडी रायता…
🥦🫐🍎🍇🥬🥬
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्यः-
कोवळ्या काकड्या,
घट्ट ताजे दहि,
साय,
सैंधव मीठ,
फोडणीची मिरची (ठेचुन / मिक्सर मधुन काढुन घेणे),
सजावटी साठी डाळिंबाचे दाणे.

क्रमवार पाककृती:
क्रुती:-
काकड्या छान कोचवून घाव्या, फोडणीची मिरची (ठेचुन / मिक्सर मधुन काढुन घेणे)
एका मोठ्या बाऊल मधे घट्ट दहि छान फेटुन घ्यावे व त्यात साय, सैंधव मीठ चांगले मिसळुन घेणे.
कोचवलेली काकडी त्यात घाला, ठेचुन घेतलेली फोडणीची मिरची घाला आणि शेवटी डाळिंबाचे दाणे घालून सजवा.

वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी ३ काकड्या घाव्यात.
अधिक टिपा:
ठेचुन घेतलेल्या फोडणीच्या मिरचीमुळे एक छान चव येते. सैंधव मीठ असल्यामुळे पाचकही आहे. वाट्लंच तर चाट मसाला हि घालु शकता. पुलाव, बिर्याणी असेल तर जोडीला ऊत्तम.

ओव्याची भजी/पराठे

ओव्याची भजी/पराठे
🫐🍒🥦🍇🍇🍎🍎🥬
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
भजी – ओव्याची पाने, डाळीचे पीठ, मीठ, हळद, तिखट, चिमूटभर सोडा, पीठ भिजवायला पाणी, तळण्यासाठी तेल
पराठे – कणिक, डाळीचे पीठ, तांदुळाची पिठी, तेल, हळद, तिखट, मीठ, तीळ

क्रमवार पाककृती:
गोळवलकरकाकूंकडे गेले होते. डवरलेला हिरवागार बगीचा! रमाशी गप्पा मारत बसले होते. ‘जाताना ओव्याची पानं घेऊन जाशील गं भजी करायला’ काकूंचा प्रेमळ आदेश. पाने तर खुडली पण भजी कशी करायची हे कुठे माहित होते अर्थात काकुंनाच पाकृ विचारली. अगदी सोप्पी कृती. घरी येऊन लगेच करायची ठरवलं. वरूणराजालाही मनापासून साथ द्यावीशी वटली म्हणूनच की काय सतत दोन दिवस पडूनही त्याला विश्रांती घ्यावाशी वाटली नाही. मनात ठरवल्याप्रमाणे घरी येऊन लगेच केली. घरच्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घालण्याऐवजी भजी घातली. असो! भजी अप्रतिम लागतात.

कृतीः नेहमीप्रमाणे डाळीच्या पीठात पाने घोळवून भजी तळून गरमागरम सॉस बरोबर खावी
उरलेली पाने व मिरच्या वाटून पीठांमध्ये मिसळून पालकपराठ्याप्रमाणे पराठे तीळावर लाटून शेकावे. वेगळ्या पण छान चवीचे पराठे!

स्वयंपाक घरासाठी 166 टिप्स

स्वयंपाक घरासाठी 166 टिप्स
१. हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
२. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्याि खुसखुशीत बनतील.
३. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.
४. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.
५. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.
६. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.
७. डाळिंबीची उसळ शिजत असतांनाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबया आख्या राहतात व त्यांचे शिजून मेन होत नाही,तसेच डाळिंबया शिजाण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.

Read more

पौष्टिक लाडू

बिना साखरेचे पौष्टिक लाडू(डायबिटिस वाले पण खाऊ शकतात)
साहित्य_: खोबरे,डिंक, आळीव,काजू,बदाम,खारीक पावडर, खस खस,सुंठ पावडर, काळे मनुके,थोडी मिल्क पावडर,थोडाच गुळ,वेलची व जायफळ पूड (हे सर्व डिंक लाडू चे साहित्य) तूप
पीठ_: मुगाचे,नाचणी,बेसन,कणीक,तांदूळ ही सर्व पीठ
कृती_: ही वरील सर्व पिठे तुपात खमंग भाजून घेणे.
डिंक तळून घेणे,खारीक बदाम,काजू,खोबरे, खसखस,आळीव भाजून घेणे. गार झाल्यावर वरील सर्व एकत्र करून, तूप कोमट करून ह्यात घालून मिक्सर वर बारीक करून लगेच लाडू वळणे…मस्त टेस्टी लागतात….😋😊👍
(डायबिटीस वाले तर खाऊच शकतात.गुळ अगदी नकोच असेल तर काळे मनुके,खारीक पूड जास्त घाला)…😊

रानभाजी चिवळ

रानभाजी चिवळ

चिवळच्या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ इ.चिवळ ही रानभाजी ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते

लागणारे साहित्य
1) एक अर्धा किलो चिवळची भाजी,
2)अर्धा वाटी बेसण
3)2 कांदे मध्यम आकारात चिरलेले,
4)तेल, तिखट, हळद, मीठ, जिर, मोहरी (आपल्या अंदाजानुसार)

कृती
1) सर्वप्रथम चिवळची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची सगळी मूळं काढून फक्त कोवळे बारीक बारीक पाने ठेवा.
2) नंतर ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतल्यावर थोडी कोरडी करून नंतर बारीक चिरून घ्या.
3) कढईत तेल टाकुन जिर मोहरीची खरपुस फोडणी घाला नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो मस्त मऊ होईपर्यंत शिजू द्या कांदा शिजत आला की मग त्यावर तिखट मिठ हळद घालुन थोडा ठसका गेला की मग चिरलेली भाजी त्यात टाकुन देऊन सगळी भाजी एकजीव करुन घ्या .
4) नंतर त्या भाजीत हळुवार बेसन सोडत जा बेसन टाकल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी. 5 ते 7 मिनिटे मंद गॅसवर शिजवुन घ्या. नंतर तुमची चिवळची भाजी तयार होते.
ही खरपूस भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा पोळीसोबत घाऊ शकता.