Back to Top

Category: पुस्तक परिचय

गेम चेंजर संच पुस्तक परिचय

गेम चेंजर संच

तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून मानवी जीवन बदलून टाकणारे… गेम चेंजर

जगमोहन एस. भानवर

अनुवाद :
रमा हर्डीकर-सखदेव

मूल्य ३००₹ टपाल ३०₹ एकूण ३३०₹

 

सत्य नडेला

मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.

Read more

पक्षी, पशु, आणि डाकू-पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – Birds,Beasts And Bandits

मूळ लेखन – कृपाकर आणि सेनानी

अनुवाद – शुभदा पटवर्धन

पुस्तकाचे नाव – पक्षी, पशु, आणि डाकू

मूल्य : १६०₹ टपाल ३०₹ एकूण १९०₹

पुस्तक परिचय: उमा निजसुरे

कृपाकर आणि सेनानी या दोन वन्यजीव छायाचित्रकारांचे वीरप्पनने केलेले अपहरण आणि त्यातून त्यांची झालेली सुटका यावर आधारित हे पुस्तक आहे.

८ ओक्टो १९९७ रोजी बंदीपूर येथील

Read more

स्वत्व अधोरेखित करणारे ‘स्वराज्य@७५ – पुस्तक परिचय

स्वत्व अधोरेखित करणारे ‘स्वराज्य@७५`

मूळ लेखक :जे. नंदकुमार

अनुवादक : डॉ. मोहिनी पाठक

प्रकाशक : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

पृष्ठसंख्या : १६८.

मूल्य : १५०₹ टपाल ३०₹ एकूण १८०₹

 

पुस्तक परिचय: पवन बोरस्ते

साभार मुंबई तरुण भारत

स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचा ‘स्वत्व` हा महत्त्वाचा ऊर्जास्रोत होता, ज्यामुळे त्यांना परकीय आक्रमणापुढे शरणागती न पत्करता हिमतीने लढण्याची प्रेरणा मिळाली. भारतातील विविध भागांसह अगदी काश्मीर आणि कन्याकुमारीपर्यंत

Read more

शोध मन: स्वास्थ्याचा वाचन कट्टा पुस्तक परिचय

चिंता
स्वरूप आणि उपाय
अर्थात

शोध मन: स्वास्थ्याचा

लेखक: डॉक्टर प्रदीप पाटकर

मूल्य: १४०₹ टपाल ३५₹ एकूण १७५₹

 

तुटलेली मन साधणे, पुन्हा उभारणे, सशक्त करणे हा मानसोपचाराचा हेतू असतो. भारतात १० लाख लोकांमागे व १ लाख मनोरुग्णांमागे एक मानसोपचार तज्ञ उपलब्ध हे प्रमाण असल्यामुळे मानसोपचाराचे प्रचंड काम आपण

Read more

मराठेकालीन शौर्यकथा वाचन कट्टा पुस्तक परिचय

मराठेकालीन शौर्यकथा

किंमत १५०₹ टपाल ३०₹ एकूण १८०₹

 

संपूर्ण भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाचे स्थान काही आगळेच आहे. थोर विचारवंत प्रा. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे म्हणतात, ‘‘मराठ्यांनी हिंदुस्थान बांधला.’’ थोडक्यात मराठ्यांचा इतिहास हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रापुरते न पाहता संपूर्ण हिंदुस्थान आणि त्याचे स्वातंत्र्य आपल्या डोळ्यांसमोर ठेवले. मराठे महाराष्ट्राच्या

Read more

वाचन कट्टा पुस्तक परिचय राजांच्या कथा

राजांच्या कथा

किंमत १५०₹ टपाल ३०₹ एकूण १८०₹

अनेक राजांनी आदर्शांचे हिमालय उभे केलेले आहेत. महान उदाहरणे जगापुढे ठेवलेली आहेत. सर्वभक्षक काळही त्यांची नावे पुसू शकला नाही. विस्मृतीच्या वाळवंटातही त्यांची न पुसली जाणारी पावले उमटलेली आहेत. लोकशाहीतील नेत्यांनीही त्यांचा अभ्यास, गुणानुकरण करावे असे हे महान नृपती आहेत. अशा राजांच्या गुणांचे संस्कार नवीन पिढीवर अवश्यमेव झाले पाहिजेत, नवीन पिढीला आणि सर्वांनाच त्यांची माहिती झाली पाहिजे. राजा याचा अर्थ इथे राष्ट्रनेता असा करूया. राजा असो वा राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान – रक्षण आणि पोषण ही त्यांची आद्य कर्तव्ये होत. तसेच पुलंच्या भाषेत शीत (अन्न), सूत (वस्त्र), आणि छत (निवारा) या किमान गोष्टी त्याने जनतेला पुरवल्याच पाहिजेत. म्हणूनच संस्कृतमध्ये म्हटलेले आहे, ‘राजा प्रकृतिरंजनात्’ जो प्रजेचे रंजन करतो तोच राजा. पाचही गरजा पूर्ण झाल्या तरच रंजन होणार हे खरेच आहे. तर या पाचही गरजा (अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय साहाय्य) पूर्ण करून काही राजांनी जनतेला आणखीही खूप काही दिले आहे, अशा काही अज्ञात, अल्पज्ञात, उपेक्षित नि प्रसिद्धही अशा राजांचा हा कालपट आपल्यापुढे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रय

वाचन कट्टा पुस्तक परिचय

पॉवर ऑफ कॉन्फिडन्स

लेखक: मनोज अंबिके

मूल्य : २२५₹ टपाल ३०₹ एकूण २५५₹

 

विश्वास, आत्मविश्वास, स्वविश्वासाच्या जोरावर कोणतेही काम यशस्वी होऊ शकते, याची प्रचिती अनेकदा आपल्याला येत असते. पण आत्मविश्वासाबाबत अनेक जण डळमळीत असतात. आपल्याला हे करता येईल का, जमेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांचा बागुलबुवा मनामध्ये कायम असतो. मनोज अंबिके यांनी ‘पॉवर ऑफ कॉन्फिडन्स’मधून आत्मविश्वास जागृत करण्याची उर्जा दिली आहे. आपण वेगळे आहोत हे लक्षात घेऊनच आपल्यातील वेगळेपण शोधण्यातहे पुस्तक मदत करते. आत्मविश्वास म्हणजे काय, तो केव्हा असतो, केव्हा नसतो,आत्मविश्वासाचे शत्रू, त्यावर विजय कसा मिळवायचा, देहबोली, स्वतःवर विश्वास, स्वसंवाद, दुसऱ्याशी सुसंवाद, जीवनाचे ध्येय, सकारात्मक मन, मनाचे सामर्थ्य, बेधडक वृत्ती, यशाची गुरुकिल्ली आदी छोट्या छोट्या प्रकरणांतून आत्मविश्वास जागविण्याचे भान यातून मिळते.

स्वतःमध्ये व दुसर्‍यांमध्ये आत्मविश्‍वास जागवण्यासाठी प्रत्येकजण ‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी… * बेधडक व्हा * अपयशातील यश * विश्वासाची शक्ती * बलस्थानं ओळखा * वेगळेपण ओळखा * आत्मविश्वासाचे शत्रू * स्वतःवर विश्वास ठेवा * दृष्टीतला आत्मविश्वास * संवादातून आत्मविश्वास * पडा पण ध्येयाच्या दिशेने * ‘नाही’ म्हणायचा अधिकार

‘कुलामामाच्या देशात’

‘कुलामामाच्या देशात’ एक अदभूत वन कथा संग्रह
———————————————–
लेखक: जी बी देशमुख

पृष्ठ:१३५ मूल्य:२००/ टपाल:३५/ एकुण:२३५/

मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेले “कुलामामाचे देशात “हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. दिवसेंगणिक या पुस्तकाला वाढते समिक्षण वाचून परत वाचण्याचा मोह झाला.

अमरावतीचे प्रसिध्द साहित्यीक तथा केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याचे वरीष्ठ अधिकारी श्री जी. बी. देशमुख यांनी त्यांचे मित्र वन विभागाचे मुख्य वन संरक्षक श्री. रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्याने त्याच्या मेळघाटातील १७ वर्षाचे सेवाकाळात

Read more