Back to Top

Category: वाचन कट्टा

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण
पूर्व प्राथमिक शिक्षण, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत शिक्षण, बालपणात प्रारंभ आणि प्राथमिक शाळेत प्रवेश
केल्यावर सुमारे पाच, सहा, किंवा सात वर्षांच्या वय
शिक्षणासाठी संस्थात्मक व्यवस्था जगभरात मोठ्या प्रमाणात बदलतात, जसे संस्थांना लागू केलेली नावे. सामान्यत:
अर्भकांच्या काळजीसाठी केंद्राला दिलेल्या अटी – लहानपणाच्या पहिल्या टप्प्यातील (सुमारे तीन महिने ते तीन वर्षे
वयाची) – अर्भक शाळा, डे केअर, डे नर्सरी आणि क्रेच , सर्वात सामान्य म्हणजे नर्सरी शाळा आणि बालवाडी.
सामान्यतः,बालवाडीच्या आधी (चार किंवा पाच ते सहा वयोगटांसाठी) , जे शालेय वयाच्या मुलांसाठी आहे ज्यांना पुरेसे
परिपक्व मानले जात नाही आणि म्हणून ते प्राथमिक शाळेसाठी एक प्रकारची तयारी शाळा म्हणून काम करतात.
बालवाडी प्राथमिक शिक्षणाचा एक भाग मानली जाते. Continue Reading

अनौपचारिक शिक्षण mul lekh

अनौपचारिक शिक्षण

अनियमित शिक्षणाला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. या प्रकारच्या शिक्षणात काहीही निश्चित नाही. म्हणून
याला प्रासंगिक आणि अनियोजित शिक्षण असेही म्हणतात. हे नैसर्गिक किंवा नैसर्गिकरित्या घडते. हे शिक्षण
पूर्वकल्पित नाही. मूल नैसर्गिकरित्या त्याच्या कुटुंबात आणि शेजारच्या, क्रीडांगण, पार्क इत्यादी मोकळ्या
वातावरणात सार्वजनिक ठिकाणी उठणे, बसणे, खेळणे, बोलणे याद्वारे मुक्तपणे प्राप्त करते. हे शिक्षण Continue Reading

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

Continue Reading

उगवतीचे रंग

उगवतीचे रंग

‘ तेच ते…’

बऱ्याच रसिकांना कविवर्य विंदा करंदीकर यांची ‘ तेच ते…’ ही कविता माहिती असेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा विंदा चाळीसगावला आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ही कविता ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी मी लहान असल्याने त्या कवितेतला गहन अर्थ कळला नव्हता. पण आपल्या जीवनात त्याच त्या असलेल्या गोष्टी सारख्या कराव्या लागत असल्याने येणारा वैताग मात्र बालसुलभ मनाला कळला होता. आज विंदा असते तर अजून भरपूर विषय त्यांना या कवितेत भर घालायला मिळाले असते. Continue Reading

अढी…

अढी…

 

आईचं दिवसकार्य झालं आणि नातेवाईकांनी घरचा रस्ता धरला. उषानेही आपले कपडे बॅगेत भरायला सुरूवात केली.
रत्ना, तिची वहिनी म्हणाली, “उषा, तू पण लगेच निघणार? राहिली असतीस जरा…” पण दोघींनाही त्यातला पोकळपणा माहित होता.
आई असतानाही उषा क्वचितच माहेरी रहायला आली होती. आई दवाखान्यात अ‍ॅडमिट असताना, तिने कर्तव्य म्हणून सगळं केलं, पण आपल्या घरून येऊन – जाऊन. तिचा नवरा, महेशही सकाळी म्हणाला, “तुला रहायचं असेल तर माझी काही हरकत नाही. मी आणि आई दोघे जातो. तू तुझ्या मनाप्रमाणे ठरव.” पण उषा बॅग भरून त्यांच्याबरोबर निघालीच Continue Reading

पारंपरिक वाणांची बीज बँक

पारंपरिक वाणांची बीज बँक 🌱
वेगवेगळय़ा हंगामांतील विविध पारंपरिक पिकांच्या निरोगी आणि सर्वोत्तम बिया गोळा करून त्या बांबूच्या टोपल्यांमध्ये अथवा मातीच्या भांडय़ांत र्निजतुकीकरण करून साठवून ठेवल्या जातात, या संचयाला बीज बँक असे म्हणतात. ही पद्धत इतर अनेक संस्थांबरोबरच ‘बायफ’नेही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर विकसित केली आहे. यामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे. Continue Reading

मैत्री

त्याची अन् तीची सोशल मिडीयावर ओळख झाली. चॅटिंग करता करता गहिरी मैत्री झाली. दोघांनी ही वेळोवेळी मैत्री नितळ राहण्यावर भर दिला. नात्यातले पावित्र्य हाच त्यांच्या मैत्री चा आधार बनला.

एक दिवस दोघे भेटले अन चित्रपट पहायला गेले. चित्रपटातील आईचा संघर्ष अन वेदना बघून तो विव्हळ झाला. त्याचे संवेदनशील मन भरून आले. तिच्या नजरेने हे हेरले. अन् तीने हलकेच त्याला थोपटले.
तो तीच्या खांद्यावर डोके ठेउन अश्रुवला अन् तीनेही त्याचे सांत्वन केले. तो गेला स्वतःच्या गावी अन् sms केला कि काल तू मला आईचे वात्सल्य दिले. Thanks mom . ती गहिवरली. Continue Reading

रामराम

रामराम

रामराम ही अभिवादनाची पुरातन रीत आहे. खेड्यापाड्यांत अजूनही रामराम करणारी अनेक मंडळी आढळतात. प्रत्येक प्रहराला बदलते अभिवादन ही इंग्लिश लोकांची रीत आहे. गुड मॉर्निंग ते गुडनाईट असा हा त्यांचा सदिच्छा प्रवास असतो.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री. अरविंद इनामदार प्रत्येक वेळी रामराम म्हणतात. गेल्या वीस वर्षात त्यांच्या मुखातून अभिवादनाचा अन्य कोणता शब्द त्यांनी उधारल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

कुसुमाग्रजांच्या तोंडून अगदी अभावितपणे बाहेर पडणारा श्रीराम हा स्वगत उद्गार आणि अरविंद इनामदारांचा, रामराम ही वाणीभूषणे होत.

तुकाराम महाराजांनी एका अभंगात लोकांचा निरोप घेताना म्हटले होते, आम्ही जातो आमच्या गावा। आमचा राम राम घ्यावा।। Continue Reading

” साऊ “

!! ” साऊ “…!!

पत्र लिहिणे हे आजकाल आपण सारेच विसरत चाललोय. मात्र कधीकाळी पत्र हेच संपर्काचे व सानिध्याचेही माध्यम होते आपल्या समाजात. एक वेळ अशीही होती की , वर्षानुवर्षे पती पत्नी बोलतही नसत की एकमेकांचा हात इतरासमोर हाती देखील घेऊ शकत नसत. अशावेळी पत्र लिहून एकमेकांना आपल्या भावना पोचवल्य जायच्या . ते पण कधी तर दोघांपैकी कुणी एक परगावी जाई तेव्हाच . सावित्री – जोतीराव यांचे सहजीवन एका संपूर्ण पुस्तकाचाच विषय आहे.या सहजीवनात देखील एक बाब आहे की , त्या काळात सावित्रीने जोतीरावांना पत्र लिहिली आहेत. पण उपलब्ध असणारी तीन पत्रे हा खरेतर त्या दोघांच्या सहजीवनाचा कसलाही विषय नसून समाजातील विविध घडामोडींची माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहेत. इतके ” समाजमय गुंतणे ” सावित्री जोतीरावांनी त्यांच्या जीवनात अवलंबले होते. सावित्रीची तीन पत्रे काही वेगळ्या मुल्यमापनातून पाहण्याची गरज आहे.,,.पाहूया. Continue Reading