Back to Top

Category: वाचन कट्टा

फुलपाखरू

फुलपाखरू…..

दुकानात असताना वैशालीचा फोन वाजला. आईंचा कॉल संध्याकाळी 7:30 ला कसा काय आला या विचारातच तिने फोन कानाला लावला

‘हॅलो वैशाली! खूप कामात आहेस का ग?’
‘नाही आई! बोला न?’
‘ अग पियुने वरच्या रूममध्ये खूप गोंधळ घातलाय! कोणाशीतरी फोनवर जोरजोरात बोलत होती… रडत होती.मग वरच्या रूममधून वस्तू फेकल्याचे आवाज आले म्हणून मी वर गेले तर माझ्या अंगावर ओरडली.. ‘पहिली खाली जा तू.. अजिबात वर येऊ नकोस.’ आणि आता दरवाजा लॉक करून बसलीये.नक्की काय झालंय ते कळत नाही ग!’ वैशालीच्या सासूबाईंनी चिंतीत स्वरात पण एका दमात सांगितलं.
‘बर बर ,मी येते. तुम्ही आणि पप्पा अजिबात काळजी करू नका आणि कुणीच वरती जाऊ नका. स्वराला ही जाऊन देऊ नका वरती.’
‘येशील न लवकर.’
‘निघालेच.१५-२० मिनिटात येतेच.’

घरापासून जवळच वैशालीच् कपड्यांचं छोटस बुटीक होत. तिचे मिस्टर कामावरून येताना दुकानातून तिला घेऊनच घरी येत. प्रियांका आणि स्वरा तिच्या दोन मुली. पियू नववीत तर स्वरा सहावीत.

संदीपला कॉल करून हाताखालच्या माणसांवर दुकान टाकून ती रिक्षात बसली. बंगल्याच्या जवळ येताच स्वरा धावत बाहेर आली.

‘ताईने खोलीची वाट लावलीये बहुतेक.’ती बोलली. स्वराच्या चेहेऱ्यावर वरती नक्की काय घडलंय याची उत्सुकता होती तर आजी आजोबांचे चेहेरे पडलेले होते.

‘ओके. नो प्रॉब्लेम. मी बघते न काय झालंय ते..’ वैशालीने तिच्या मागून वरती चढणाऱ्या स्वराला थांबवत म्हंटले.’ तुम्ही सर्वजण मस्त tv बघा. मी आलेच.’

‘पियू…!’दरवाज्यावर टकटक करत वैशालीने हाक दिली.’दरवाजा उघडतेस न बाळा?’
दरवाज्याच लॉक उघडल्याचा आवाज येताच वैशाली दरवाजा ढकलून आत गेली. खोलीत वादळ आलं होतं.टेबलावरची पुस्तक, नोट्स जमिनीवर आल्या होत्या. पलंगावरच्या उशानीही जमिनीवर उड्या मारल्या होत्या आणि चक्रीवादळ पलंगावर हुंदके देत पडलं होतं.

‘काय झालं माझ्या सोनूला?’तिने खोलीत शिरत विचारलं. पियुने अजूनच डोकं उशीत खुपसले.

‘तू नीट उठून बसलीस तरच आपल्याला बोलता येईल न राणी.’पियूच्या बाजूला बसत वैशाली बोलली.

हुंदके देतच ती उठून बसली.हुशार, गोरीपान, दिसायला ही गोड असणारी पियु आता मात्र रडूनरडून लाललाल झाली होती.

‘He left me. He said आता आपलं breakup झालंय’ रडतरडत पियु बोलली.

‘म्हणजे?’बसलेला आश्चर्याचा धक्का लपवत वैशाली बोलली. ‘ मला काही कळेल अस नीट बोलशील का तू?’

‘मम्मा..थोड्या वेळापूर्वी राजने मला कॉल केला होता.तो मला बोलला की यापुढे I am not your boyfriend. आपलं ब्रेकअप झालय’
‘अग ,पण राज तुझा फक्त friend होता न?’
‘Friend होता पण 4 months पासून boyfriend होता.’पियुने रडक्या आवाजात उत्तर दिलं. ‘मम्मा मी आता school ला कशी जाऊ. सर्वजण हसतील मला…चिडवतील.. मी स्कूलमध्ये कोणासोबत बोलू?मी काय करू मम्मा?’वैशालीच्या मांडीत पडत हुंदके देत देत ती बोलली.

चौदा वर्षाच्या मुलीला पडलेले गहन प्रश्न ऐकून हसावं, रडावं की चिडाव हेच वैशालीला कळत नव्हतं. मनात विचारांचं चक्र चालू झाले. हे काय वय आहे का पियुच boyfriend असण्याचं. हिच्या वयाची मी असताना घरात अस काही बोलले असते तर घरातल्यानी माझं काय केलं असत देवास ठाऊक.हिला चांगल दमात घ्यावं अस वाटतंय.. पण याक्षणी तिच्यावर रागावले तर ही परत कधीही कोणतीही गोष्ट मला विश्वासात घेऊन सांगणार नाही.

आजपर्यंतचे सर्वच प्रश्न आपण समजुतीने, संवाद साधूनच सोडवलेतआणि म्हणूनच विश्वासाने पियुने ही गोष्ट माझ्याशी share केली. मग हा प्रश्नही शांतपणेच हाताळला पाहिजे. क्षणार्धात वैशालीच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले. तिने पियुकडे बघितले. तिच्या केसांमधून हात फिरवत थोडा विचार करून ती बोलली..

‘पियू तुला माहीतच आहे पप्पांच आणि माझं lovemarriage आहे.पप्पा नोकरीला लागले तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं.. मी घरीं सांगितलं आणि दोन्ही घरच्या संमतीने आमच लग्न झाले. त्यामुळे boyfriend वगैरे या गोष्टीबद्दल मला थोडं कमीच कळते. मला काही शंका आहेत तू समजावून सांगशील का मला काही गोष्टी.’

‘हो. विचार की.’
‘मग पहिलं मला सांग boyfriend आणि bestfriend मधला फरक काय?’

‘अग bestfriend म्हणजे फक्त मित्र.आणि बॉयफ्रेंड म्हणजे … love. आपण त्याच्यासोबत सतत राहतो. Lunch time, free periods, school मधला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यासोबतच घालवतो. आणि न मम्मा .. ज्या मुलींना बॉयफ्रेंड असतो न त्यांना school मध्ये cool समजलं जातं’ आपल्या परीने extra knowledge देत पियू मम्मीला समजावत होती.

‘ओके. मग या boyfriend सोबत लग्न करते का ग त्याची girlfriend?’
‘ईsss…. काहीही काय बोलतेस ग मम्मा. यात लग्नाचा काय संबंध आहे?’ मम्मीच्या अज्ञानाची कीव करत ती बोलली. वैशालीने सुटकेचा निश्वास टाकला आणि मनातच म्हंटल चला हे प्रकरण वरवरचच दिसतय.

‘पियू, सर्व छोट्याछोट्या गोष्टि तर तू मला सांगतेस मग ही boyfriend ची गोष्ट विसरलीस का सांगायला?’

‘अग मम्मा..मी सांगणारच होते पण राज बोलला नको सांगूस मम्मीला. सर्वच गोष्टी तिला सांगायला तू आता लहान नाहीस आणि तुझीही काही सिक्रेटस हवीतच न!’ पियू माझ्या नजरेला नजर न देता बोलली.

‘ओके! आणखी काय काय बोलतो ग राज?’ मी तिला बोलत करायचा प्रयत्न केला.

‘तो बोलतो की.. पियू.. तू अजिबात चांगली दिसत नाहीस.. मी म्हणून तुला विचारलं नाहीतर तुला दुसरं कोणी विचारलही नसत.’ उदास स्वरात वैशालीची सुंदर मुलगी बोलत होती. ‘विशाल, श्रेया, स्मिता माझे bestfriends होते न.. पण मी आता त्यांच्याशी जास्त बोलत नाही कारण त्यांच्याशी बोललेलं राजला आवडत नाही. सध्या राजशिवाय मला कुणीही friends नाहित.. मी आता school ला जाऊन काय करू मम्मा. कुणाशी बोलू?’ डोळयातून येणार पाणी पुसत पियू बोलली.

अस आहे तर सर्व. म्हणजे पियूच्या मनाचा पूर्ण ताबा आता राजने घेतला होता किंबहुना पियुने तो त्याला घेऊन दिला होता. वैशाली मनातच हसली.

‘पियू, तुला माहीत आहे न माझे किती मित्र मैत्रिणी आहेत..’ तिच्या पाठीवर हात ठेवत वैशाली बोलली,’आणि प्रकाशकाका तर माझे सर्वात bestfriend आहेत. त्यांच्याशी बोलू नकोस अस पप्पानी मला कधी सांगितलेलं तू ऐकलयस का?’
‘नाही.’विचार करत पियू बोलली.

‘Boyfriend, friend किंवा lifepartner असा हवा की जो आपला आत्मविश्वास वाढवेल. ना की कमी करेल.आज तुझ्या पप्पांमुळेच मी आत्मविश्वासाने बुटीक चालवतेय. हो की नाही?’
पियुने मानेनेच होकार दिला.

‘जो मुलगा तुला इतर friends शी बोलू नकोस सांगतो, तू सुंदर दिसत नाहीस अस सांगतो तो तुझा boyfriend or friend असूच शकत नाही.. मित्र पाय ओढणारे नसावेत सपोर्ट करणारे असावेत.. अग उलट आज तर तू खुश झालं पाहिजेस कारण आज तुझा independence day आहे?’

‘तो कसा काय?’प्रश्नार्थक चेहेऱ्याने पियूने मम्मीकडे बघितलं.

‘सांगते..’ हसतच वैशाली बोलली,’पियू या वयातली तुम्ही मूल म्हणजे फुलपाखरासारखी असता.. आजूबाजूला असणारे मित्र मैत्रिणी म्हणजे तुमची फुल. सर्व फुलांतून आनंदाने मध गोळा करायचे तुमचे हे दिवस. मध म्हणजे आपल्या friends च्या चांगल्या गोष्टी शिकणं बर का.. पण या छोट्या वयात तुम्ही एकाच फुलात अडकून पडता.. भुंगा कमळात अडकतो न तसा.. मग ते कमळच् भुंग्याला जग वाटत इतर फुलांचा त्याला विसर पडतो…’

‘जसा मला पडला तसा..’ मम्मीचा हात पकडत पियू बोलली.

‘अगदी बरोबर…’ वैशाली तिला जवळ घेत बोलली.’ जस तू मम्माशी गोष्ट share नाही केलीस, इतर मित्र मैत्रिणींना विसरलीस अगदी तसाच… हे वय मुळी प्रेमात पडायचं नसतंच ग .. या वयात लव्हस्टोरीज आवडतात आणि खऱ्या ही वाटतात..आवडणारा प्रत्येक मुलगा लव्हस्टोरीतला हिरो वाटू लागतो.. या वयात मुलांबद्दल वाटणार attraction हे फक्त harmones मुळे होत हे science मध्ये शिकता तुम्ही..हे वय असत अनुभवाने आणि शिक्षणाने समृद्ध होण्याचं. मग आज breakup मुळे तू त्या कमळातून मुक्त झालीस.. आता तुला तुझे हरवलेले friends परत मिळतील..म्हणूनच आज तुझा independence day.’
आता पियूचा चेहेरा हसरा झाला होता.

‘आता उद्या स्कूलला गेलीस न की विकास, श्रेया ,आणि स्मिताशी परत बोलायला लाग पहिल्यासारखी.. आणि कोणी राजबद्दल विचारलं न तर सांग की मी breakup केलय म्हणून..’
‘खोट बोलू?’
‘खोट कशाला.. breakup करूया अस तो बोलला तेव्हा तू मनापासून तयार नव्हतीस पण आता.. आता माझं सुंदर फुलपाखरू आहे न तय्यार breakupला?’
पियूच्या चेहेऱ्यावर पुसटस हसू होतं.

‘फुलपाखरा खोली आवरूया का?’वैशालीने पलंगावरून उठताना हसतच विचारले.
‘मी आवरेन मम्मा ..तू कपडे बदल..’पियू पुस्तक उचलत बोलली.

पुढचा आठवडा वैशालीने पियुकडे शाळेचा विषय काढलाच नाही पण तिचे बारकाईने लक्ष होते पियूकडे. पियू नॉर्मल होती. आज मात्र शाळेतून घरी येताच पियुने वैशालीला घट्ट मिठी मारली.

‘काय ग..आज स्वारी खुशीत दिसतेय..’
वैशालीचा हात हातात घेत पियू बोलली, ‘हो मम्मा.. आज मी खूप खुश आहे.तुला खर सांगते ममा.. तू त्या दिवशी समजावलं खर पण दुसऱ्या दिवशी मला स्कूलला जायचं खूप टेन्शनच आलं होतं. पण मी तुझं ऐकायचं ठरवलं. सर्वात पहिले मी विकास श्रेया आणि स्मिताला sorry बोलले आणि त्यांनीही मला माफ केलं इतकंच नाही तर मला कोणी राजवरून काही बोलल तर ते माझ्या बाजूने उभेही राहिले आणि तेव्हाच मला कळलं की खरे friends कसे असतात ते. आज तर अजूनच गंम्मत झाली.. राज मला sorry बोलला. परत girlfriend होतेस का म्हणून विचारत होता?’
‘मग?’ वैशाली उत्सुकता न लपवता बोलली.
‘मग काय मम्मा.. मी त्याला सरळ बोलले तुझीच काय कोणाचीच girlfriend होऊन मला कमळात अडकायच नाही .. त्यापेक्षा मम्माच फुलपाखरू बनून मला उंचउंच उडायचय.हे सुंदर जग पाहायचं आहे…. मम्मा ..त्याला न काहीच कळलं नाही बहुतेक..’ वैशालीच्या हातावर टाळी देत खळखळून हसत पियू बोलली.

पियूला जवळ घेत वैशाली समाधानाने म्हणाली,’त्याला नाही कळलं .. पण मला काय म्हणायचं आहे हे माझ्या लाडक्या फुलपाखराला कळलं न यातच माझं खर यश आहे…’

डॉ. अपर्णा प्रल्हाद निजाई
सुनील इनामदार

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात या गमती जमती

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात
या गमती जमती

01. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.
02. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत कपडे मळणार नाहीत याची काळजी घ्या.
03. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या.

Read more

ऑफलाईन आई

ऑफलाईन आई

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’  आवडते यावर निबंध लिहायला दिला.
प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.
मला एक “अशिक्षित” आई हवी आहे जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्याबरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

Read more

मुलांवर संस्कार कसा करावा??

मुलांवर संस्कार कसा करावा??
सिनेमे बघून, टीव्ही बघून, युट्युब, इंस्टा वगैरेमुळे मुलं बिघडतात हे तद्दन खोटं तर आहेच शिवाय एकूण समाजाने आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी मारलेली ही लोणकढी थाप आहे.
मुलांची जगण्याची रीत, नियम हे आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्यांच्या अकलनावर अवलंबून आहे. हे आकलन मुलांनी केलेली कृती, त्या कृतीला मिळालेला प्रतिसाद, त्यांना आजूबाजूच्या जगाविषयी आलेले अनुभव यांवर अवलंबून असते.

Read more

बेलाग सह्याद्री.

गडकोट ककल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उं च, प्रचंड, दगु मग डोंगर, वेड्यावाकड्या ऊं चच उं च
डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री.
खरतर दगु मग पिा कहच गडाची खरी ओळख, परंतुडोंगर नुसता दगु मग असला उंच असला तरी दगु ग
बांधिी करताना इतरही बाबी लक्षात घ्याव्या लागत असत, जसे की आसपासची भौगोललक रचना, स्थान –
लनणिती, संरक्षिात्मक बाजू, गडाची बांधिी, संरक्षि,मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू ववचारात
घेऊनच दगु बग ांधनी केली जात असे.
आज महाराष्ट्रातील गडककल्ल्यांचा ववचार के ला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड,
लिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर/गड आपले लक्ष वेधून घेतो, इतकी वैभविाली
दगु सग ंपत्ती असलेला हा महाराष्ट्र.
तर या गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे? गडावर
अविेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि सवग प्रश्नांची उत्तरे लिवछ्त्रपतींच्या आज्ञापरात
लमळतात.

Read more

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत शिक्षण, बालपणात प्रारंभ आणि प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यावर सुमारे पाच, सहा, किंवा सात वर्षांच्या वय

शिक्षणासाठी संस्थात्मक व्यवस्था जगभरात मोठ्या प्रमाणात बदलतात, जसे संस्थांना लागू केलेली नावे. सामान्यत: अर्भकांच्या काळजीसाठी केंद्राला दिलेल्या अटी – लहानपणाच्या पहिल्या टप्प्यातील (सुमारे तीन महिने ते तीन वर्षे वयाची) – अर्भक शाळा, डे केअर, डे नर्सरी आणि क्रेच , सर्वात सामान्य म्हणजे  नर्सरी शाळा आणि बालवाडी. सामान्यतः,बालवाडीच्या आधी (चार किंवा पाच ते सहा वयोगटांसाठी) , जे शालेय वयाच्या मुलांसाठी आहे ज्यांना पुरेसे परिपक्व मानले जात नाही आणि म्हणून ते प्राथमिक शाळेसाठी एक प्रकारची तयारी शाळा म्हणून काम करतात. बालवाडी प्राथमिक शिक्षणाचा एक भाग मानली जाते.

 

पूर्व प्राथमिक शिक्षण इतिहास

Read more

नवोदय विद्यालय

नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) ही मुख्यत्वे भारतातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती शाळांची एक प्रणाली आहे. नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली ही संस्था भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. जेएनव्ही पूर्णपणे केंद्रीय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित सीबीएसई (सीबीएसई) पूर्णपणे निवासी आणि सहा शैक्षणिक शाळा असून सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. जेएनव्हीला विशेषतः भारताच्या ग्रामीण भागात हुशार मुले शोधण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना उत्तम निवासी शाळा प्रणालीइतकेच शिक्षण प्रदान करण्याचे काम दिले जाते. ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल. विशिष्ट प्रतिभा किंवा योग्यता असलेल्या मुलांना त्यांच्या देय देण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून वेगाने प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे. अशा शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी भागांशी समान पातळीवर स्पर्धा करता येईल.एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारत व इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. हे लक्ष्य गट म्हणून प्रतिभावान ग्रामीण मुलांची निवड आणि निवासी शाळा प्रणालीतील गुणवत्तेच्या तुलनेत गुणवत्तेचे शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे.

Read more

#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे

#family time
#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे
अहमदनगर मधील पारनेर तालुका अनेक आश्चर्याने भरलेला आहे त्यातच निघोज चे रांजणखळगे म्हणजे आशियातील सर्वात मोठे रांजणखळगे..
या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वाहते
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
+17
Dattatraya Gawade, Shashank Khedekar and 84 others
11 Comments
1 Share
Like

Comment
Share

11 Comments

View 8 more comments

#लवणस्तंभ

रांजणखळगे पाहून झाल्यावर अजुन एक पारनेर मधील आश्चर्यकारक ठिकाण म्हणजे वडगाव दर्या पाहायचे ठरले.. . वडगाव दर्या म्हणजेच प्रसिद्ध माकडाचे वडगाव जसे हे ठिकाण माकडासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते लवनस्तंभा साठीही प्रसिद्ध आहे .
लवणस्तंभ ….एक नैसर्गिक भुरूप !गुहांमधील क्षारयुक्त द्रव्यामुळे तयार झालेले स्तंभ म्हणजे लवणस्तंभ . पठार ,मैदान ,पर्वत,डोंगर,दरी, घळई इत्यादी भुरूपा सारखे हे सुद्धा एक भुरूप आहे .परंतु हे भुरूप आपल्याला पहाण्यासाठी दुर्मिळ असते .ब्रिटन,युगोस्लाव्हिया ,यु एस ए ,आदी देशात हे पहायला मिलते ,भारतात ते फक्त दोन ठिकाणी पहायला मिळतं एक म्हणजे उत्तरभारत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या ठिकाणी …. येथे दोन गुहा आहेत आणि त्यात अधोमुखी लवणस्तंभ तयार झालेले आहेत ….हा एक नैसर्गिक अविष्कार आहे. ……
वडगाव मध्ये कातळ खडकात दोन गुहा आहेत. एक वेल्हाबाईची आणि दुसरी दर्याबाईची. गुहेतून आत जाताना कातळ आहेत. वरच्या छताच्या बाजुनेच सतत पाणी ठिबकत असते. ते साठवण्यासाठी खाली टाक्या, हौद बांधलेले आहेत. ठिबकणारे पाणी त्यात साठते. जंगलातील प्राणी, पक्षी यांना प्यायला उपयोगी पडते. या पाण्यात कलशियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत. एका ठिकाणी गोमुखातून पाणी पडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहून आम्ही स्तिमित झालो.खूपच थंडगार पाणी तेथे आहे.
खूप सारे माकडे येथे पहिल्यापासून होती सध्या कोरोना काळामध्ये माकडाची संख्या कमी झाली आहे येथील माकडे खूप लोकांना त्रास देत नाही उलट सर्वांच्या जवळ जाऊन हाताने खाणे खातात . . मुलांसाठी ही खूप छान one day पिकनिक आहे.
+7
Shashank Khedekar, Sunita Lahane Dhok and 49 others
4 Comments
Like

Comment
Share

पुणेरी विभाग

पुणेरी विभाग
1बाग आहे पण फुले नाहीत –तुळशी बाग
२ वहात्या पाण्याचा थांबा – नळ स्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव – पाषाण
४ थकल्या भागल्यांची वाडी – विश्रांत वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे – सहकारनगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको –
७ आडवी तिडवी वस्ती -वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी – चिमण्या गणपती
९ फॉरेनची गल्ली –
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती – लोकमान्य कॉलनी
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली – धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान –जिलब्या मारुती
१३ बेवडा ब्रीज –दारुवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा – शनिपार
१५ हार आहे तोही दगडाचा – खडक माळ
१६ याचे थालीपीठ होत नाही – विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ –नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत – मॉडेल कॉलनी
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत – हिराबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो? – कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली – घोरपडी पेठ
२२ गिळंकृत करणारे मास्तर – हडपसर
२३ सगळे इथे ऐटीत – हिंजवडी
२४ सुगंधित नगर-
२५ हा भितीदायक पट्टा आता-मगरपट्टा चांगलाच सुधारलाय!