Back to Top

Category: वाचन कट्टा

सुनो ना सून लो ना!

सुनो ना सून लो ना!
पालक आणि मूल यांच्यातील भांडणाचं ९९.९९ टक्के वेळा एकच कारण असतं ते म्हणजे “अरे तू माझं ऐक जरा” आणि त्याला मिळणारा प्रतिसाद “दरवेळी मी तुमचंच का ऐकायचं?”

आणि मग आपापला किल्ला जोमाने लढवण्याच्या नादात कधी भांडण पेटतात, हे कळतच नाही.
मी माझ्या पंधरा वर्षाच्या पालकत्वाच्या प्रवासात ज्या चुका केल्या आणि त्या चुका आहेत या माझ्या लक्षात येऊन मी त्या सुधारण्याच्या प्रयत्नात आहे त्यातील महत्वाची चूक म्हणजे “सुनावणे”.

किती वेळ खेळायचं, किती वेळ अभ्यास करायचा, स्क्रीन टाईम किती असला पाहिजे, भाजी कोणती खाल्ली पाहिजे, दूध किती पिले पाहिजे, मित्र कोणते निवडले पाहिजेत, पाहुण्यांशी कसं बोललं पाहिजे, अक्षर कसं असलं पाहिजे, बोलताना शब्द कोणते वापरले पाहिजेत, उफ…

Read more

निर्णय

निर्णयशक्ती कमकुवत असणारे लोक खूप अहंकारी असतात. निर्णय घेता येत नाही हे मान्य न करता ते फक्त चिडचिड करतात.

सहकारातील अनेक सभांमध्ये निर्णय घेता येत नसल्याने खडाजंगी होऊन सभा संपतात.

निर्णय घेता न येणे हा शारिरीक कमकुवतपणा सारखा मानसिक कमकुवतपणा आहे. तो सवयीने घालवता येऊ शकतो.

अनेकदा पटापट निर्णय घेऊ शकणारा माणूस बुद्धीच्या वापराच्या बाबतीत कमजोर असतो. त्याचे निर्णय भावनाप्रधान होऊन चुकतात.

Read more

माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..

माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..

शिक्षण या विषयावर गेली काही वर्षे, माझे जे वाचन झाले, स्नेहच्या शिक्षणाच्या निमित्ताने माझे जे निरीक्षण झाले, त्यानुसार माझ्यापुरती मी शिक्षणाची व्याख्या तयार केली आहे, ती म्हणजे,
उत्सुकतेपोटी नवीन गोष्टींचा शोध घेणे, शोध घेता घेता आपल्या क्षमतांचा अंदाज बांधणे, त्या क्षमतांच्या जोरावर शिकलेल्या गोष्टी वापरून बघणे आणि त्यातून आपल्या “कम्युनिटी”तील आपले स्थान बळकट करणे, म्हणजे शिक्षण.

या शिक्षणाच्या प्रक्रियेत पालक म्हणून माझी भूमिका या व्याख्येला अनुसरून काय असली पाहिजे? माझ्या अनुभवानुसार मी माझी भूमिका पुढीलप्रमाणे निवडली आहे.

Read more

व्यक्तिमत्व

बंडू आणि रघु, दोघांनाही दूध आवडत नाही.

पण रोज अर्धाकप दूध घेणं दोघांना अनिवार्य आहे.

बंडू दूध घेताना खूप कटकट करतो, त्रास देतो, दोन तास लावतो.

रघुला हा त्रासदायक क्षण लवकरात लवकर संपवून टाकायचा आहे, तो एका घोटात दूध संपवून मोकळा होतो.

बंडू घरातील सर्वात लाडका असेल तर घरातले सगळे बंडूच्या पुढे पुढे करतात, बंडू आपले महत्व वाढवून घेतो, बंडू घरातल्यांनाही निगोशिएट करायला सुरुवात करतो, पुढे जाऊन त्याचे व्यक्तिमत्व नकारात्मक घडू शकते.

Read more

मोठेपणी तू काय होणार ?

लहान मुलांना सहज प्रश्न विचारतात मोठेपणी तू काय होणार ?

हे खरंच असं विचारणं कितपत योग्य आहे?

बऱ्याचदा लहान मुलांवर मोठ्या लोकांच्या अतृप्त इच्छा लादल्या जातात. आपल्याला जे करता आले नाही ते तू कर सांगितले जाते. किंवा पालकांनाही निट समजत नसतय कि आपले मुल नक्की काय करायला जन्माला आलय तर त्या मुलाला काय समजणार डोंबल ?
मोठ्यांच निम्म लाईफ संपते तरी समजत नाही तर लहान मुलांना आपण कोणीतरी काय व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं ? हे खरंच माहिती असतं का ?

मला वाटतं त्यांना ते समजत नाही . तुम्हाला तरी माहिती होतं का हो लहानपणी की मोठेपणी तुम्ही काय होणार ? पण तरी आपण लहान मुलांना विचारत राहतो तू मोठेपणी कोण होणार ?

Read more

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

#पुणे
#शिक्षणाचेमाहेरघर
#कृतज्ञता

सध्याचा हॉट टॉपिक म्हणजे शाळेत फोन न्यायला परवानगी असणे. तसा हा विषय अगदी नवीन नाही, पूर्वीही शाळेत फोन, विशेषतः स्मार्ट फोन नेऊन मुलांनी अनेक उद्योग केल्याची उदाहरणे घडलेली आहेत. लॉक डाऊन काळात मात्र स्मार्ट फोनवर अवलंबून असणे अपरिहार्य झाले. आता शाळा, क्लास, इतर रुटीन नियमित सुरू झाले, पण फोनची सवय काही सुटत नाही. मुलांचं शाळेत फोन आणण्याचं, गरज नसताना तो वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याचं प्रमाण वाढत आहे. पालकही सोयीसाठी म्हणून मुलांना शाळेत फोन नेऊ देतात. त्याची वेगवेगळी कारणं सांगतात. ती कदाचित पालकांच्या बाजूने योग्यही असतील. काही मुलं पालकांच्या नकळत फोन आणतात. पण मुलांना अजून परिणामांचे गांभीर्य कळले आहे असे वाटत नाही.

स्मार्ट फोन असावा की न

Read more

गणित

आज 22 डिसेंम्बर. राष्ट्रीय गणित दिवस. थोर भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस..🙏🙏

आपल्या देशात लोकांना एक तर गणित आवडतं किंवा आवडत नाही अशा दोनच शक्यता. पण उपयोग मात्र सगळ्यांना करावाच लागतो. त्यातही जे गणित आवडत नाही म्हणतात, ते अशक्य creative कामं करताना दिसतात, गायक, वादक, नर्तक, चित्रकार, तंत्रज्ञ…कितीतरी उदाहरणे देता येतील.
🎼🥁🎹📽️🎨🌌

या सगळ्यांची कामं तर गणिताच्या भक्कम पायावर उभी आहेत.
मग नेमकी नावड कशाची? कशामुळे?
त्याच त्याच उदाहरणांचा सराव करावा लागल्यामुळे? शिक्षकांनी विचारांना चालना देणारे प्रश्न न विचारल्यामुळे?
सरावाच्या कंटाळ्यामुळे?

गणिताची शिक्षिका म्हणून मांडलेले काही विचार, अनुभव…

Read more

औद्योगिक मानसशास्त्र

औद्योगिक मानसशास्त्र

……….

• जेव्हा Netflix चा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्व अधोरेखित होते. गेलेल दशक हे माध्यमांच होत, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं.

आपल्या मेंदू मध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरवात झाली. ह्या माहिती ला process करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. Netflix भारतात २०१६ पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरवात केली जे मानवी मेंदू साठी

Read more

इ ५ वी ते ७ वी साठी वाचनीय पूस्तकं

इ ५ वी ते ७ वी साठी वाचनीय पूस्तकं

१)एक होता कार्व्हर
२)तोत्तोचान
३)पुण्यभूमी भारत सुधा मूर्ती
४)रस्कीन बॉण्डच्या कथा रोहन प्रकाशन
५) तुमचे आमचे हिरो मनोविकास प्रकाशन
६) पक्षी आमचे सखे शेजारी किरण पुरंदरे
७)सव्वाशे बोधकथा ग्रंथाली
८)शब्दमागच्या गंमत गोष्टी सुजॉय रघुकुल समकालीन प्रकाशन

Read more

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदरांच्या मतांचे गणित ? घ्या जाणून. 🗳
भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड होणे आवश्यक आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सामान्य जनता मतदान करु शकत नाही. पण सर्व राज्यांचे आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची निवड करतात. आता राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते. आणि खासदार आमदारांच्या मतांना किती

Read more