Back to Top

Category: विविध उपक्रम

varioius activities for kids

निष्पाप

मुलं किती निष्पाप असतात 🥰 परवा आमच्याकडे पसारा या विषयावर गप्पा चालू होत्या.. मी मुलींना सांगत होते की, आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं की, तिन्हीसांजेला घर आवरून, हातपाय स्वच्छ धुवून देवापुढे दिवा लावतात त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं आणि घरी लक्ष्मी येते 😊 !! मग लक्ष्मी कोण ? ती कशाची देवता आहे ? वगैरे गप्पा झाल्या. देवताळेपणा म्हणून नाही तर त्यानिमित्ताने त्यांना नीटनेटकेपणा, स्वच्छ्ता, वाणी शुध्द होण्यासाठी श्लोक, स्तोत्र म्हणणे यात काहीच गैर नाही. त्याला कर्मठपणा, रूढी, परंपरा वगैरे ची जोड देण्याचा अट्टाहास तर मुळीच नाही. असो, मुद्दा असा की हे सगळं बोलणं झालं आणि आम्ही आपापल्या कामाला लागलो.

Read more

“प्रबोधन ऐपावाक”

ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधन तर्फे सुट्टी समृद्ध करणारा विद्यार्थ्यांसाठीचा विशेष उपक्रम…

“प्रबोधन ऐपावाक”

(मराठी वाचू, समजू शकणाऱ्या ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी)

कोरोनाच्या काळात मागे पडलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणारा
‘ऐका-पाहा-वाचा-करा’ हा सुट्टीतील विशेष उपक्रम

कालावधी – १ ते ३१ मे २०२२
वर्गणी – रु. १००/- फक्त

उपक्रमाची खास वैशिष्ट्ये –
• ऐका, पाहा, वाचा यापैकी रोज १ लिंक
• ‘वाचा’चे साहित्य इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत पाठवले जाणार
• विशेष अनुभव देणाऱ्या रोज एक अशा एकूण २५ कृतींचा खजिना

Read more