शकारी
शकारी विक्रमादित्य म्हणजेच दुसरा चंद्रगुप्त मौर्य याची जीवनगाथा
लेखक: जनार्दन ओक
मूल्य: ३९०₹ टपाल ३०₹ एकूण ४२०₹ घरपोच
चंद्रगुप्त द्वितीय हा गुप्त घराण्यातील दुसरा श्रेष्ठतम राज्यकर्ता होता. समुद्रगुप्ताने सुवर्णयुगाचा पाया घातला तर चंद्रगुप्ताच्या कारकीर्दित वैभवशाली सुवर्णयोगच अवतरले होते. त्याच्या कालखंडापर्यंत विस्तारवादाची प्रक्रिया पूर्ण होऊन विशाल साम्राज्यांची निर्मिती झाली. आर्थिक समृद्धीने उच्चांक गाठला होता. राजकीय स्थैर्य आणि सुबत्तेमुळे
आपुला संवाद आपणासी
आत्मसंवाद कसा कराल
लेखक: शाड हेल्मस्टेटर
अनुवाद: रोहिणी पेठे
मूल्य: २२५₹ टपाल ३५₹ एकूण २६०₹
तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणणारी आणि आयुष्य जगण्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात देणारी आत्मसंवादाची साधीसोपी पण महत्वाची तंत्रं
“सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण”
“काकू, जयेश आहे का घरी?”
“कोण रे?”
“मी हर्षवर्धन. जयेश आणि मी कॉलेजमध्ये एकाच वर्गात आहोत. काल दसऱ्याची सुट्टी होती, त्यामुळे आमच्या प्रोजेक्ट चं प्रिंटिंग राहिलंय. मी तीच हार्डडिस्क घ्यायला आलो होतो.”
“ये ना आत. पहिल्यांदाच आलास ना आमच्या घरी? जयेश पूजेला बसलाय. दहा-पंधरा मिनिटात होईलच त्याची पूजा.”
हर्षवर्धन बैठकीच्या खोलीत बसला. साधं पण स्वच्छ आणि अतिशय टापटीप असलेलं ते घर होतं. कसलीही महागडी सजावट नव्हती. देशोदेशीच्या आकर्षक वस्तूंनी भरलेल्या शोकेस नव्हत्या. चकचकाट नव्हता. त्या साधेपणाचा विचार करता करताच त्याचे डोळे दाराच्या उंबऱ्यापाशी खिळले. उंबऱ्यावर सुबक रांगोळी काढली होती. दाराला छान ‘खऱ्या’ फुलांचं तोरण होतं. तो खुर्चीतून उठला आणि जवळ जाऊन पाहू लागला, तोच जयेशची आई आली
मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?
नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरून बसतोस. लक्ष दुसरीकडेच. मन एकाग्र केलंस तरच कळेल न तुला. हे एकाग्र करणं, concentrate करणं काय असतं कुणास ठाऊक? आई बाबांना असं का वाटतं मुख्य म्हणजे हे एकाग्र कसं व्हायचं असा प्रश्न मुलांना पडतो आणि मुलांचं Concentration कसं करायचं, कसं वाढवायचं हे टेन्शन पालकांना असतं.
आज जरा Concentration वर प्रकाश टाकू या…
मुलांची एकाग्रता मोठ्या माणसांइतकी नसते पण जर मनाला सवय लावली, ट्रेनिंग दिलं तर काॅन्स्नट्रेशन स्पॅन वाढू शकतो.
पहिला प्रश्न म्हणजे…
1)मुलांची एकाग्रता (Attention span)किती दीर्घ असतो…?
मुलं एखाद्या गोष्टीवर किती काळ लक्ष एकाग्र होऊन शकतात?
संवाद : खारी बिस्किटांशी!
अनेकांना (म्हणजे अनेक मोठ्या माणसांना) मोठ्या माणसांशी बोलताना काही प्रॉब्लेम येत नाही. पण यातल्याच अनेकांना असा प्रश्न पडतो की मुलांशी काय बोलायचे? आणि कसे बोलायचे? आणि सर्वात महान प्रश्न म्हणजे.. का बोलायचे?
असं का होतं..? कारण मुले खारी बिस्किटा सारखी असतात तर (तमाम) मोठी माणसे मारी बिस्किटा सारखी असतात. म्हणजे जगातले एक खारी बिस्किट दुसर्या खारी बिस्किटा सारखे नसते. प्रत्येकाचे पापुद्रे वेगवेगळे, प्रत्येकाचे थर असमान, बाहेरुन सारखी वाटली तरी प्रत्येकाची आतली रचना एकदमच भिन्न! म्हणून तर आपण म्हणतो, ‘प्रत्येक मूल वेगळं असतं, युनिक असतं.’ पण बहुतेक मोठी माणसं ही मारी बिस्किटा सारखी आतून बाहेरुन सारखीच गुळगुळीत असतात.