Back to Top

Category: Parents

मुलांवर संस्कार कसा करावा??

मुलांवर संस्कार कसा करावा??
सिनेमे बघून, टीव्ही बघून, युट्युब, इंस्टा वगैरेमुळे मुलं बिघडतात हे तद्दन खोटं तर आहेच शिवाय एकूण समाजाने आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी मारलेली ही लोणकढी थाप आहे.
मुलांची जगण्याची रीत, नियम हे आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्यांच्या अकलनावर अवलंबून आहे. हे आकलन मुलांनी केलेली कृती, त्या कृतीला मिळालेला प्रतिसाद, त्यांना आजूबाजूच्या जगाविषयी आलेले अनुभव यांवर अवलंबून असते.

Read more

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत शिक्षण, बालपणात प्रारंभ आणि प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यावर सुमारे पाच, सहा, किंवा सात वर्षांच्या वय

शिक्षणासाठी संस्थात्मक व्यवस्था जगभरात मोठ्या प्रमाणात बदलतात, जसे संस्थांना लागू केलेली नावे. सामान्यत: अर्भकांच्या काळजीसाठी केंद्राला दिलेल्या अटी – लहानपणाच्या पहिल्या टप्प्यातील (सुमारे तीन महिने ते तीन वर्षे वयाची) – अर्भक शाळा, डे केअर, डे नर्सरी आणि क्रेच , सर्वात सामान्य म्हणजे  नर्सरी शाळा आणि बालवाडी. सामान्यतः,बालवाडीच्या आधी (चार किंवा पाच ते सहा वयोगटांसाठी) , जे शालेय वयाच्या मुलांसाठी आहे ज्यांना पुरेसे परिपक्व मानले जात नाही आणि म्हणून ते प्राथमिक शाळेसाठी एक प्रकारची तयारी शाळा म्हणून काम करतात. बालवाडी प्राथमिक शिक्षणाचा एक भाग मानली जाते.

 

पूर्व प्राथमिक शिक्षण इतिहास

Read more

#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे

#family time
#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे
अहमदनगर मधील पारनेर तालुका अनेक आश्चर्याने भरलेला आहे त्यातच निघोज चे रांजणखळगे म्हणजे आशियातील सर्वात मोठे रांजणखळगे..
या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वाहते
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
+17
Dattatraya Gawade, Shashank Khedekar and 84 others
11 Comments
1 Share
Like

Comment
Share

11 Comments

View 8 more comments

#लवणस्तंभ

रांजणखळगे पाहून झाल्यावर अजुन एक पारनेर मधील आश्चर्यकारक ठिकाण म्हणजे वडगाव दर्या पाहायचे ठरले.. . वडगाव दर्या म्हणजेच प्रसिद्ध माकडाचे वडगाव जसे हे ठिकाण माकडासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते लवनस्तंभा साठीही प्रसिद्ध आहे .
लवणस्तंभ ….एक नैसर्गिक भुरूप !गुहांमधील क्षारयुक्त द्रव्यामुळे तयार झालेले स्तंभ म्हणजे लवणस्तंभ . पठार ,मैदान ,पर्वत,डोंगर,दरी, घळई इत्यादी भुरूपा सारखे हे सुद्धा एक भुरूप आहे .परंतु हे भुरूप आपल्याला पहाण्यासाठी दुर्मिळ असते .ब्रिटन,युगोस्लाव्हिया ,यु एस ए ,आदी देशात हे पहायला मिलते ,भारतात ते फक्त दोन ठिकाणी पहायला मिळतं एक म्हणजे उत्तरभारत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या ठिकाणी …. येथे दोन गुहा आहेत आणि त्यात अधोमुखी लवणस्तंभ तयार झालेले आहेत ….हा एक नैसर्गिक अविष्कार आहे. ……
वडगाव मध्ये कातळ खडकात दोन गुहा आहेत. एक वेल्हाबाईची आणि दुसरी दर्याबाईची. गुहेतून आत जाताना कातळ आहेत. वरच्या छताच्या बाजुनेच सतत पाणी ठिबकत असते. ते साठवण्यासाठी खाली टाक्या, हौद बांधलेले आहेत. ठिबकणारे पाणी त्यात साठते. जंगलातील प्राणी, पक्षी यांना प्यायला उपयोगी पडते. या पाण्यात कलशियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत. एका ठिकाणी गोमुखातून पाणी पडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहून आम्ही स्तिमित झालो.खूपच थंडगार पाणी तेथे आहे.
खूप सारे माकडे येथे पहिल्यापासून होती सध्या कोरोना काळामध्ये माकडाची संख्या कमी झाली आहे येथील माकडे खूप लोकांना त्रास देत नाही उलट सर्वांच्या जवळ जाऊन हाताने खाणे खातात . . मुलांसाठी ही खूप छान one day पिकनिक आहे.
+7
Shashank Khedekar, Sunita Lahane Dhok and 49 others
4 Comments
Like

Comment
Share

ती’ वयात येताना

ती’ वयात येताना…
15 वर्षांच्या नेहाच्या दप्तरात तिच्या बाबांना एका मुलाचे प्रेम पत्र सापडते.. नेहाचे बाबा अत्यंत काळजीत.. त्या अवस्थेत ती चिठ्ठी ते नेहाच्या आईला दाखवितात.. आई थोडी गंभीर होते परंतु ही चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे नेहाला न कळून देण्याबाबत व तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्याबद्दल नेहाच्या बाबांना विनंती करते… दुसऱ्या दिवशी सकाळी, आई नेहाला आवडणाऱ्या गरमा गरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते.
अभ्यास करत बसलेल्या नेहाला म्हणते; नेहा अभ्यास जरा बाजूला ठेव बरं आणि हे गरमगरम पोहे खात माझ्याशी मस्त गप्पा मार. नेहाशी गप्पा मारता मारता आई म्हणते. अगं नेहा; आता आपण दोघी मैत्रिणी झालोत. नेहा थोडी बावचळते. अगं तू मोठी झालीस ना आता.आज तुझी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नार्थक भाव उमटतात.
“नेहा, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक बदलही सुरु होतात. छोट्याछोट्या गोष्टींचा राग यायला लागतो, आपली चीडचीड वाढते, कधी कधी खूप उदास वाटतं, एकटं वाटतं आणि खूप रडू येतं तर कधी कारण नसतानाही उगीच हसू येतं, आणि हो कधी कधी माझा आणि बाबाचाही राग येऊ शकतो हं तुला.. या सगळ्या बदलांबरोबरच वयात येताना अजून एक निसर्गतः मोठा बदल आपल्यात होत असतो तो म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं; एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणलाच प्रेम समजून बसतो, पण बाळा या वयात जे होतं ते आकर्षण असतं.. प्रेम नसतं.. जसं एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर आपल्याला चटकिनी एखादा ड्रेस आवडून जातो अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा या वयातील मुलींना आवडू शकतो.
कोणाला त्याचं दिसणं, आवाज, डोळे तर कोणाला त्याची स्टाईल, त्याचं बोलणं आवडतं आणि मुलांच्या बाबतीतही अगदी असंच होतं असतं. थोडक्यात हे बाह्य आकर्षण असतं. या वयातील मुलामुलींचं शरीर व मन अजून परिपक्व झालेलं नसतं. कोणावर प्रेम करण्याइतकी प्रगल्भता अजून त्यांच्यात आलेली नसते. आज एक, तर उद्या कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते.. या वयात मनही थोडं अस्थिर आणि चंचल झालेलं असतं.. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं तेच कळत नसतं.
थोडक्यात सांगायचं तर; जसं जेवणाच्या ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो; अगदी तसंच आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं ताट आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई-वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शाळा, आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती, हे सगळे! हे सर्व आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत ते म्हणजे आयुष्य नाही. परंतु ज्यावेळी आपण कोणा एका व्यक्तीलाच आयुष्य समजायला लागतो त्यावेळी अडचण निर्माण होते.
हे वय खूप नाजूक असतं गं बाळा. सगळं जग या वयात सुंदर दिसत असतं पण त्या सुंदरतेमागचं भयाण रूप मात्र दिसत नसतं.. या साठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे, आकर्षणचा कितीही मोठा खड्डा या प्रवासात आला तरी तो चुकवून पुढे जाणंच फायद्याचं असतं. आकर्षणात अडकणं हा आपल्या ध्येयामधील खूप मोठा अडथळा असतो.
तो अडथळा आपल्या मार्गात येऊ नं देता आपण मार्गक्रमण करणं गरजेचं असतं. आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून नेहाला रडू अवरत नाही. ती उठून आईला कडकडून मीठी मारते आणि आतून आपल्या दप्तरातून ती चिठ्ठी आणून आईला दाखवत म्हणते; आई मी ही या खड्ड्यात पडणार होते गं; पण तू वाचवलंस मला.. आता कितीही मोठे खड्डे आले तरी मी ते सहज पार करू शकेन ही आता खात्री वाटते कारण आता या प्रवासात मी एकटी नाही तू ही आहेस माझ्याबरोबर..आई ही तिला जवळ घेऊन; आपण तिच्या बरोबर असल्याचा विश्वास तिला स्पर्शाने देते.
वयात आलेल्या प्रत्येक मुलांच्या पालकांचा त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाचा संवाद असणे गरजेचे असते.. या संवादाच्या अभावामुळेच बहुतांशी वयात आलेली मुले ही चुकीच्या दिशेने वाहवत जाण्याची शक्यता असते.. अनेक शंका, उत्सुकता यांनी त्यांना घेरून टाकलेले असते त्यामुळे त्यांच्या शकांचे निरसन व दमन झालेल्या उत्सुकतांचे शमन हे पालकांमार्फत योग्य पद्धतीने झाल्यास मुले त्यांचा टीन एजमधील प्रवास नक्कीच हसत खेळत पार करू शकतील..
– मृणाल घोळे मापुस्कर (लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून पंख संस्थेच्या समुपदेशक आहेत)

आईमुलीचं नातं

आईमुलीचं नातं

मला वाटतं, या साध्याशा दोन ओळीत आई मुलीच्या नात्याचं सारं सार सामावलं आहे.
पुत्र जन्मानं सामाजिक उंची लाभत असली तरी भावनांच्या हिंदोळ्यावर उंच उंच अनुभव देते ती कन्याच.
किती ही लाडाकोडानं जोपासा, पण मुलगा हा आपल्या विश्वात रमणारा, आपली वाट चालतांना कळत नकळत नाळेपासून वेगळा होणारा. अन् मुलगी? ती गगनाला गवसणी का घालेना, पतंगासारखी जोडली असते जमीनीशी, आपल्या जन्मदात्यांशी. सुरवातीची काही वर्षं पित्याकडे कल असणारी मुलगी, मोठी होता होता आईच्या कष्टांना, तिच्या भावनांना, तिच्या विचारसरणीला, तिच्या कुटुंबातल्या, समाजातल्या स्थानाला समजू लागते . स्त्री सुलभ कोमलता, कणव, माया, आणि आईबरोबरची एकरूपता यामुळे आईला समंजस सोबत देऊ लागते, आईची कड घेऊ लागते, आईची काळजी घेऊ लागते, ती कायमचीच.
म्हणूनच, जगात डावी ठरविली गेली आणि लेकीच्या भविष्याबद्दल जराशी साशंक असली, तरी ही, मुलीच्या जन्मानंतर आई आपल्या स्वत:च्या भावविश्वा बद्दल निश्चितच नि:शंक होते. दूर माहेरी सोडून आलेल्या आपल्या आई, बहिणी, मैत्रिणी या सर्वांसारखं ‘या हृदयीचे त्या हृदयी’ कळणारा कुणी तरी हक्काचा जीव आपल्याला जन्मभरासाठी लाभलाय, या विचाराने ती तरारून येते. मुलीच्या संगोपनात रमते, हिरीरीने तिला घडवते, सक्षम बनवते.
आपल्या या नाजुक गुलाब कळीचं टप्पोरं फुल व्हावं आणि त्याच्या घमघमटानं आसमंत दाटून जावा अशी मनिषा ती कायम उरात बाळगते. त्यानुसार तिची निगा राखते, तिला उत्तम खतपाणी पुरविते, उगाच वेड्या वाकड्या वाढणाऱ्या फांद्यांना छाटते आणि वेळप्रसंगी बोचऱ्या काट्यांचं कुंपण घालून तिची रक्षा ही करते. या सर्व प्रवासात कधी आनंदते, कधी चिंतातूर होते, कधी दु:खी होते तर कधी नाराज ही होते. पण, या संवर्धन सोहळ्याच्या विविध छटा सांभाळण्यातच तिचं आईपण खुलून येतंय हे ही ती जाणते. मायेनं ओथंबलेलं तिचं हृदय क्षणमात्र किती ही कठोर झालं तरी त्याला पुन्हा पुन्हा वात्सल्याचा फुटलेला पाझर ती आकंठ अनुभवते आणि आपल्या लेकी पर्यंत तो पोचवते ही.
या लोभस प्रवासात ती डोळे लावून बसलेली असते त्या दिवसाकडे, जेव्हा तिच्या लेकीची सावली तिच्यापेक्षा मोठी होते. लेक सुजाण, सुघड झाली याचे दाखले मिळू लागले की माय आपल्या कष्टांचं चीज झालं समजते. हरखून जाते. पण कोडकौतुक करण्याचा तिचा ओघ न संपणारा! आपलं दुखणं खुपणं, कुरकुरणारं शरीर, मरगळणारं मन साभाळते आणि लेकीसाठी आपला हुरूप जपून ठेवते. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते…!’
आणि अशा या लेकीत गुंतलेल्या मातेला तिची छबि तसाच उबदार प्रतिसाद देते. एकीचं हसू दोन गाली पसरतं तर एकीचा आसू दोन गाली ओघळतो. या काळजाचे ठोके तिथे वाजतात तर या जीवाचं शल्य त्याला खुपतं. मग मोठेपणाचा अंगरखा पांघरून मुलगी आईला जवळ घेते, कधी शिकवते, कधी सल्ले देते, कधी कान टोचते, तर कधी नुसती शांतपणे तिचं हृद्गत ऐकून घेते. आपल्या विस्तारलेल्या पंखांखाली दुबळ्या होत जाणाऱ्या आईला सामावून घेते. हे हक्काचं पुन्हा नव्यानं मिळालेलं माहेरघर आंजारत गोंजारत आई समाधानानं शांत समईसारखी तेवत असते, स्निग्धता पसरत असते, तेलाचा शेवटचा थेंब संपेपर्यंत!

21 व्या शतकात तणावमुक्त पालक

21 व्या शतकात तणावमुक्त पालक

पालकांची व्याख्या काय आहे?
एक वास्तविक पालक म्हणजे जो आपल्या मुलांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोष दूर करण्यास आणि चांगले गुण आत्मसात करण्यास मदत करतो. तथापि, आजच्या पालकांना असे वाटते की महागड्या कपडे आणि खाण्यायोग्य वस्तू खरेदी करणे आणि कोचिंग क्लासेससाठी जास्त फी भरणे ही त्यांचे कर्तव्य आहे. त्यांना हे समजण्यास अपयशी ठरते की या गोष्टी मुलांना केवळ ऐहिक सुखांची इच्छा करतात. हे सुख त्यांच्यातील दोषांचे पालन करतात. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना खरे शिक्षण देत आहे की नाही याचा अंतर्भाव केला पाहिजे. चांगल्या गुणांचे आकलन करण्यास मुलांना मदत करणे आणि अशा प्रकारे सुखी जीवन जगणे पालकांचे कर्तव्य आहे.

केवळ आनंदी पालकच आनंदी पिढी निर्माण करू शकतात
केवळ आनंदी पालकच आनंदी पिढी निर्माण करू शकतात. मुलांच्या मनावर चांगले संस्कार (अवचेतन प्रभाव) तयार करण्यासाठी पालक आणि मुलांमध्ये चांगले संवाद असणे आवश्यक आहे. केवळ तणावमुक्त पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगण्यास शिकवू शकतात.

ते त्यांच्या मुलाशी सहज संवाद साधू शकतात. मुलांना नेहमीच तणावात असणार्‍या पालकांशी बोलण्यासारखे वाटत नाही. अशा पालकांकडे त्यांचे विचार, विचार आणि समस्या सांगत असल्यासारखे त्यांना वाटत नाही. म्हणूनच, पालकांनी तणावमुक्त राहणे आवश्यक आहे.

पालकांमध्ये ताणतणावाची कारणे
नेहमी भूतकाळात रहा
नकारात्मक चर्चा आणि दृष्टीकोन
मुलांसमोर आमच्या चुका स्वीकारत नाही
मुलांमध्ये दोष शोधण्याचा सतत प्रयत्न करीत आहे
मुलांशी बोलताना एखाद्याची वैयक्तिक प्रतिमा जतन करणे
प्राधिकृतपणे बोलणे
मुलांनाही त्यांच्यात दैवी तत्व आहे हे विसरून जा
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो
नीट समजावत नाही
मुलांशी संवाद नाही
उच्च अपेक्षा

1. नेहमी भूतकाळात रहाणे
ज्यांचे मन भूतकाळात रहात असते ते पालक आपल्या मुलांबरोबर संवाद साधू शकत नाहीत. मुले सहजपणे त्यांचे भूतकाळ विसरतात आणि नेहमीच वर्तमानात जगतात; म्हणूनच ते नेहमी आनंदी असतात. आम्ही भूतकाळातील घटना आणि घडलेल्या घटनांचे नेहमीच स्मरण करतो आणि भूतकाळात आलेल्या वाईट अनुभवांचे ओझे वाहून घेतो. म्हणून जेव्हा जेव्हा मुले आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आम्ही त्यांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची परिस्थिती नाही. म्हणूनच, आपण सद्यस्थितीत जगण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.

२. नकारात्मक चर्चा व दृष्टीकोन
‘तुम्हाला काहीच माहित नाही’, ‘तुम्ही निरुपयोगी आहात’, अशी नकारात्मक विधाने मुलांना प्रचंड त्रास देते. शारीरिक जखम बरी होतात, पण एखाद्याच्या मनावर झालेली इजा सहज बरे होत नाही. म्हणूनच मुलांशी बोलताना आपण नेहमीच आपल्या दृष्टीकोन आणि भाषणात सकारात्मक असले पाहिजे. आमची चर्चा अशी असावी की यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळावे.

3 मुलांसमोर आमच्या चुका न स्वीकारणे
आपल्या चुका मान्य केल्याने आपल्या मनावरील ताण कमी होतो. मुले आपल्याबद्दल आदर वाढवतात. मुले आपल्या पालकांची तोतयागिरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याने, तेदेखील त्यांच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारण्यास शिकतात. जेव्हा आपण आपल्या चुका लपवतो तेव्हा आपण तणावग्रस्त होतो. मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. म्हणून, जेव्हा आम्ही आमच्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा त्यांना वाटते, ‘माझे आई वडील त्यांच्या चुका स्वीकारत नाहीत तर मग मी का करावे?’ यामुळे मुले व पालक यांच्यात सूक्ष्म कलह वाढतो.

4. मुलांमध्ये दोष शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतो
जर आपण आमच्या मुलांमध्ये सतत त्रुटी शोधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नेहमीच तणावपूर्ण राहू. त्याऐवजी आपण त्यांचे चांगले गुण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांची ओळख पटवून दिली पाहिजे. परिणामी, मुलेदेखील वेळ घालवताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांची जाणीव करून घेतात आणि त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करतात. जर आपण आपल्या मुलांमध्ये दोष शोधण्याऐवजी त्यांच्या सद्गुणांकडे नजर टाकली तर आपण नेहमीच आनंदाच्या स्थितीत राहू.

5 मुलांशी बोलताना एखाद्याची वैयक्तिक प्रतिमा जतन करणर्‍याच पालक मुलांशी बोलतानाही समाजातील त्यांच्या पदाविषयी आदर राखून त्यांची प्रतिमा जपण्याचा काळजी घेतात. पालकांनी आपल्या मुलांना समाजात असलेल्या स्थानाबद्दल अभिमान बाळगल्यास मुले त्यांच्याशी कधीही संवाद साधू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत पालक ताणतणावाखाली असतात आणि मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांनी त्यांच्या कारकीर्द आणि समाजातील त्यांचे स्थान विसरून आपल्या मुलांसह नैसर्गिकरित्या वागले पाहिजे. तरच ते आनंदी राहू शकतील आणि कार्यक्षमतेने त्यांच्या मुलांना वाढवू शकतील.

6. अधिकृतपणे बोलणे
जेव्हा त्यांचे पालक त्यांच्याशी अधिकृतपणे बोलतात तेव्हा मुलांना ते आवडत नाही. अधिकाराने बोलण्याऐवजी आपण त्यांच्याशी प्रेमळपणे बोलले पाहिजे. आम्हाला अधिकृतपणे सांगितलेली कोणतीही गोष्ट स्वीकारण्यासारखे वाटत नाही. अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, अधिकृतपणे बोलण्यामुळे तणाव होतो, तर प्रेमळ बोलण्याने आनंद होतो.

7 आपल्या मुलांनाही दैवी तत्त्व आहे हे विसरून जा
मुलांशी संवाद साधताना आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक मुलामध्ये त्याच्यात दैवी तत्त्व असते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातील दैवी तत्त्वाचा आदर करा. म्हणून, मुलांबरोबर बोलताना असे समजू नका की आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत आहात. त्याऐवजी विचार करा की आपण दैवी तत्त्वाशी बोलत आहात. हे तणाव दूर करण्यात मदत करेल आणि आनंद अनुभवण्यास मदत करेल.
8 व्यवस्थित स्पष्टीकरण देत नाही
मुलांना सर्व काही व्यवस्थित समजावून सांगायला हवे. मुलांशी बोलताना आपण त्यांच्या पातळीवर जाणे आवश्यक आहे; तरच मूल आमचा आदर करेल आणि ऐकेल. अशा प्रकारे, जर मुल 1 ला इयत्तेत असेल तर पालकांनी त्या पातळीवर त्याच्याशी संवाद साधावा. तथापि, अहंकारामुळे, पालक त्यांच्याशी बोलत असताना मुलांच्या पातळीवर जाण्यास अनिच्छुक असतात आणि म्हणूनच मुले त्यांचा आदर करण्यास आणि ऐकण्यात अयशस्वी ठरतात. यामुळे त्यांच्या मनात तणाव निर्माण होतो. पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधल्यास ते त्यांचे तणाव कमी करू शकतात

9 मुलांशी संवाद नाही
मुलांना होणार्‍या अडचणी ऐकण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. पालक त्यांच्या कामात व्यस्त असतात, तर शिक्षकांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चिंता असते. परिणामी मुले मानसिक गोंधळात पडतात. ते त्यांच्या पालकांबद्दलचा आदर आणि विश्वास गमावतात. मुले त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत म्हणून पालकांवर ताण येतो. प्रासंगिक चर्चा त्यांना एकत्र आणते. म्हणूनच, पालकांनी दररोज किमान 15 मिनिटे मुलांशी सहजपणे बसून बोलणे आवश्यक आहे. यामुळे तणाव कमी करण्यात मदत होईल आणि परिणामी आनंद होईल.

10. उच्च अपेक्षा
जेव्हा आपण त्यांच्या मनात आपल्या अपेक्षेनुसार चर्चा करतो तेव्हा मुलांना ते आवडत नाही. त्यांचा अहंकार खूपच कमी असल्याने त्यांना त्वरित अपेक्षांची स्पंदने लक्षात येतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे. जेथे प्रेम नसते तेथे प्रेम असते. अशा प्रकारे, ‘माझा मुलगा माझ्या म्हातारपणात माझी काळजी घेईल, तो समाजात माझी प्रतिष्ठा कायम ठेवेल आणि वाढवेल’, अशी अपेक्षा करण्याऐवजी ‘देव नेहमीच माझी काळजी घेईल.’ असा विचार केला पाहिजे.

व्यावसायिकशिक्षण

व्यावसायिकशिक्षण

(व्होकेशनलएज्युकेशन)

कृषी, व्यापार, उद्योगइ. क्षेत्रांतीलप्रगतीसाठीव्यावसायिकवतांत्रिकशिक्षणाच्यामिश्रशिक्षणपद्धतीद्वारे,माध्यमिकशाळांततसेचमहाविद्यालयीनदर्जाच्याशिक्षणसंस्थांतदिलेजाणारेप्रशिक्षण. हेप्रशिक्षणसर्वसामान्यशिक्षणापेक्षावेगळेअसते. नोकरीमिळविण्यासाठीकिंवाव्यवसायातयशस्वीहोण्यासाठीआवश्यकअसणारीगुणवत्ताह्याशिक्षणाद्वारेसंपादनकरतायेते. यागुणवत्तेमध्येकौशल्य, क्षमता, ज्ञान, वृत्ती, कार्यव्यग्रतावपारखकरण्याचीशक्तीयासर्वगोष्टींचासमावेशहोतो.
व्यावसायिकशिक्षणप्रणालीकिंवाअभ्यासाचाअभ्यासक्रमसंदर्भितकरते, जेव्यावहारिकक्रियाकलापांवरआधारितनोकरीसाठीवैयक्तिकरित्यातयारकरते. व्यावसायिकअभ्यासक्रमांनामेकॅनिक, वेल्डरआणिअशामासिकनोकर्यासारख्यानोकर्यासंदर्भातपाठवलेजाते. तथापि, जगातीलबदलत्याअर्थव्यवस्थेमुळे,

Read more

तुलनात्मक शिक्षण

तुलनात्मक शिक्षण-
तुलनात्मक शिक्षण हे अभ्यासाचे एक क्षेत्र आहे जे संघटित केलेल्या तरतुदीवर लक्ष केंद्रित करते
आंतरराष्ट्रीय आणि आंतर-सांस्कृतिक सीमांच्या दरम्यान शिक्षण क्रियाकलाप आणि तुलनात्मक वापर
अभ्यास पद्धती तुलनात्मक शिक्षण हा पूर्णपणे अभ्यास केलेला शैक्षणिक क्षेत्र आहे
डेटा आणि अंतर्दृष्टी वापरून काढलेल्या देशाचा (किंवा देशाच्या गटातील) शिक्षणाची तपासणी करते
दुसर्या देशात, किंवा देशांमध्ये प्रथा आणि परिस्थिती.

Read more

आभासीशाळा

. प्रत्येकमुलाचीशैक्षणिकगरजाआणिप्राधान्येवेगवेगळ्याअसतातआणित्यानुसार, त्यांनाशिक्षणदिलेपाहिजे.सर्वातउल्लेखनीयनवकल्पनांपैकीएकम्हणजेआभासीशिक्षण, पारंपारिकशैक्षणिकविभागातीलसर्वोत्तमपर्याय. इंटरनेटच्याजगाद्वारेयाप्रकारचेशिक्षणविशेषतःज्यामुलांनावास्तविकशाळासंकल्पनेसतोंडदेणेअवघडआहेत्यांनाउपयुक्तठरेल. खरंतर, आभासीशाळाशिक्षणाचापुढीलमोठाउपायम्हणून
केलेगेलेआहेजेनक्कीचआपल्याप्राप्तकर्त्यांपर्यंतपोचवण्याच्यापध्दतीतबदलघडवूनआणेल. व्हर्च्युअलशिक्षणहीशिक्षणाच्याजगातएकमोठीसुरुवातआहेआभासीशिक्षणपारंपारिकवर्गातउपलब्धअसलेल्याशिक्षणासारखेनाही. याप्रकारच्याशिक्षणाचीसर्वातचांगलीगोष्टम्हणजेतीप्रत्येकविद्यार्थ्यासाठीत्याच्यासामर्थ्यवकमकुवतपणाच्याआधारावरयोग्यतेकायकरूशकतेहेविद्यार्थ्यांनाआणिपालकांनायोग्यसमुपदेशनाद्वारेपरवानगीदेते. शिक्षणप्रत्येकविद्यार्थ्यातसर्वोत्कृष्टपरिणामआणूशकतेकारणतेशिकण्याचीइच्छाजागृतकरण्यासमदतकरते. याशिवाय, विद्यार्थ्यांनापरवानगीअसलेल्यालवचिकतेमुळेचअधिकाधिकपालकआकर्षितहोतात. हेकारणआहेकीतेविद्यार्थ्यांनाशिकण्याससुलभकरतेआणिएखाद्याविशिष्टवेळीसक्तीनेकेलेजाणारेशिक्षणचनाही. अभ्यासाद्वारेहेसिद्धझालेआहेकीअभ्यासालादररोजनिश्चितनित्यकरण्यापेक्षाविद्यार्थ्यांनाजेव्हासोयीस्करअसेलतेव्हा

Read more