Back to Top

Category: Parents

पुस्तक – लेखक

दिवास्वप्न – गिजुभाई बधेका

— समरहिल – नीलची शाळा – ए एस नील

— जिथे मुलांना पंख फुटतात – अनुवाद निलांबरी जोशी

— धोका शाळा – अनुवाद हेमलता होनवाड

शिक्षण – आनंदक्षण – रमेश पानसे

— खेळण्याचा जादूगार – अरविंद गुप्ता

— शिक्षणातील ओयासिस – लीला पाटील

— शिक्षण देता घेता – लीला पाटील

— मुलं घडताना – घडविताना – रेणू दांडेकर

— खऱ्या शिक्षणाच्या शोधात – डेव्हिड ग्रीबल

— शाळेपासून मुक्ती वर्षापुरती – राहुल अल्वारीस

— मुलांचा कल कसा ओळखायचा – उषा आठवले

— गारांचा पाऊस – शोभा भागवत

— छोटी सी बात – राजीव तांबे

— गंमत शाळा – भाग १ ते ४ – राजीव तांबे

— माय कंट्री स्कूल डायरी – जुलिया गार्डन

— तोत्तोचान -तेत्सुको कुरोयानागी

— आपली मुलं – शोभा भागवत

त्याच बरोबर पुढील काही वेबसाईटची सुद्धा आम्हाला आमचे अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी मदत झाली व अजूनही होत आहे!

— WWW. Arvindguptatoys.com

— TED Talks

— EDX – Online Open Courses

— NCERT – PDF Books

सामूहिक पालकत्वाची गरज

कडक उन्हाळ्याच्या शेवटी आमच्या घराच्या, व्हिडियो डोअर फोनच्या वरती, एका बुलबुलने, नेटाने आजूबाजूच्या काड्या, जुने कापडाचे तुकडे वगैरे गोळा करून एक टुमदार घरटे बनवले होते. एकीकडॆ बेभान वारा, मधूनच येणारा मृदुगंध असे पावसाची चाहूल देणारे, मुग्ध करणारे वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे एक दिवस अचानक त्या टुमदार घरट्यातून पिल्लांचा किलकिलाट ऐकू लागला.

न राहवून, मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने घरट्यात डोकावून बघितले आणि अहाहा, नुकतीच जन्माला आलेली दोन सुंदर पिल्ले दिसली! पिल्लू कुणाचेही असो, दिसते मात्र गोडच!

जवळपास मिस्टर आणि मिसेस बुलबुल यांची पिल्लांना भरवणे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांचं हवं नको ते बघणे अशी लगबग सुरु होती.

साधारण दोन आठवड्याने मी दरवाजातून बाहेर पडताना सवयीने त्या घरट्याकडे बघितले आणि मला एकदम शांतता जाणवली. म्हणून पुन्हा एकदा घरट्यात डोकावून बघितले तर पिल्ले चक्क उडून गेली होती. मिस्टर आणि मिसेस बुलबुल पिल्लं जन्म देऊन केवळ दोन ते तीन आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले होते!

ते बघितल्यावर माझ्या डोक्यात काही विचार घोळू लागले. बुलबुलचे पालकत्व म्हणजे साधारण घरटे बांधणे, अंडी घालणे, ती उबवणे आणि काही दिवस पिल्लं सक्षम होईपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे, एवढे मर्यादित होते. त्यासाठी त्याला आणि तिला वर्षातून केवळ दोन महिने द्यायचे होते.

पिल्लांच्या संगोपनाचा असाच काळ, जर आपण चिमण्या, कावळे, गाई, हरणं, वाघ आणि हत्तींचा बघितला, तर तो वेगवेगळा असल्याचेमाझ्या लक्षात आले. मला असेही जाणवले की जे प्राणी एकटे किंवा जोडीने राहतात त्यांना निसर्गाने पालकत्वाची कमीत कमी जबाबदारी दिली आहे. त्यांची पिल्ले तुलनेने लवकर सक्षम होतात.

मात्र कळपात राहणारे, सामाजिक जीवन जगणारे जे प्राणी आहेत त्यांच्यात मात्र कळपाच्या संख्येप्रमाणे पिल्लांच्या संगोपनाचा कालावधी हा वाढत जातो. आपण माणसं देखील निसर्गतः: कळपात राहणारे, सामाजिक प्राणी आहोत. त्यामुळे आपल्या पिल्लांचा सक्षम होण्याचा कालावधी देखील थोडा किंबहुना बराच जास्त आहे.

मात्र निसर्गात जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर कळपात असलेल्या पण अजून सक्षम न झालेल्या पिल्लांची जबाबदारी कळप कधीच एकट्या आईवर, किंवा दुकट्या आई वडिलांवर टाकून मोकळा होत नाही. त्या पिल्लांची जबादारी संपूर्ण कळप घेतो. त्याचबरोबर पिल्ले सक्षम झाली की कळप त्या पिल्लांच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करत नाही, त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.

जोपर्यत आपण “उत्तम आयुष्य” जगण्याच्या नावाखाली एकामागे एक “अनैसर्गिक व्यवस्था” उभ्या करण्याच्या मागे लागलो नव्हतो, तोपर्यंत माणसांच्या कळपाचे जगणे पण असेच होते. मात्र हळहळू या अनैर्सगिक सामाजिक व्यवस्थांचा माणसाच्या जीवनावर अत्यंत वेगाने भलाबुरा परिणाम होऊ लागला.

हा परिणाम म्हणून, आज बहुतेक कुटुंबे छोटी होत चालली आहेत, त्रिकोणी होत आहेत. आई वडील दोघेही नोकरी करत आहेत. घरांची दारे बंद राहत आहेत, मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्तीत जास्त वेळ चार भिंतीच्या आत कोंबली जात आहेत.

माणसाच्या पिल्लांचे हे जग अनुभवण्यासाठी, त्यांनी वापरायच्या साधनांचे, पद्धतींचे, वेळेचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन, मोठी माणसे स्वतःची साधने, पद्धती, वेळापत्रक आणि जगाविषयीचे आकलन मुलांवर नकळतपणे लादत आहेत.

गंमत म्हणजे या सगळ्या परिस्थितीत, आपल्या पिल्लांचा आई, वडिलांवर, कळपावर अवलंबून राहण्याचा कालावधी मात्र कुठेच कमी झालेला नाही उलटा तो वाढतच चालला आहे आणि इथेच सगळी गोची झाली आहे.

मुलांची जबाबदारी ज्यांनी घायची ती माणसे स्वतःच्याच जबाबदारीत जास्तीत जास्त गुंतत चालली आहेत मुलांच्या आजूबाजूला मुलांवर “निरपेक्ष” प्रेम करणाऱ्या, निरपेक्षपणे एकत्र येऊन मायेची उब देणाऱ्या कळपातील माणसांची संख्या वेगाने कमी होत आहे. माणसांच्या कळपाने आता कळपातील पिल्लांची जबाबदारी घेण्याचा सुद्धा व्यवसाय करून टाकला आहे!

ज्या वयात फक्त उबदार स्पर्श हवा आहे, ऐकणारे कान हवे आहेत, गाणी गोष्टी सांगणारी माणसे हवी आहेत, त्या वयात “तासावर पैसे” घेणारी माणसे मुलांना जास्तीत जास्त वेळ “शांत” बसवून एक “भावनिकदृष्ट्या कुपोषित” पिढी घडवत आहेत!

यात पालकांचा दोष आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. पालकांवर देखील विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रचंड जबाबदारी येऊन पडली आहे. मात्र पालकांनी अशा परिस्थितीत स्वतःला “आयसोलेट” करणे, समाजापासून फटकून राहणे तडतोब कमी करण्याची गरज आहे.

आपल्याला आता जुनी वाडा संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती परत आणणे तर शक्य नाही. मात्र आपण एकत्र येऊन आपल्या मुलांना शक्य तितकी भावनिक सुरक्षितता, निरपेक्षपणे प्रेम करणाऱ्या माणसांचा सहवास, आजूबाजूचे चांगले जग, त्या जगात उद्दात्त आणि उमेदीने काम करणारी माणसाने, संस्था दाखवून मुलांच्या जगण्याचा उत्साह तर वाढवू शकतोच की!

अशा प्रकारच्या घुसळणीतून मुलांना या जगातील जे वैविध्य अनुभवता येईल त्यातून आपल्या पिल्लांना हळूहळू जगण्याचा अर्थ समजू लागेल. हे सगळं करण्यासाठी म्हणून आपल्याला पालकांचे छोटे छोटे “सामूहिक पालकत्व” या संकल्पनेवर काम करणारे गट हवेत.

आपली पिल्लं कधीतरी त्या बुलबुलाच्या पिल्लांसारखी उंच भरारी घेत उडून जाणारच आहेत पण ती उडून जाण्याआधी, पालकांचे हे गट या पिल्लांना जे अनुभव देणार आहेत, तेच अनुभव पुढील काळात वृद्धाश्रमांची संख्या कमी करणार आहेत, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही..

चेतन एरंडे.

View insights

291 post reach

Like

Comment

Send

Share

*मुलांसाठी उपयुक्त युट्यूब चॅनल्सः*

मुलं मोबाईल बघणारच आहेत.. आता बघताच आहात तर काय बघाल? काही YouTube चॅनल्स शेअर करीत आहोत.

*कृपया पालकांनी स्वतः खालील चॅनेल्सना भेट द्यावी आणि ते योग्य वाटल्यास आपल्या मुलांना सुचवावे.*

*शैक्षणिक*

* Khan Academy Kids* – शिक्षणाचे विविध विषय सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शिकवणारा चॅनल. (यांचे फ्री अॅप पण आहे)

**Khan Academy Kids**

https://youtube.com/@khanacademykids?feature=shared

*Khan Academy*

https://youtube.com/@khanacademy?feature=shared

*विज्ञान*

*CrashCourse Kids* – विज्ञानाचे विविध विषय सोप्या भाषेत समजावणारा चॅनल.

https://youtube.com/@crashcoursekids?feature=shared

*SciShow Kids* – विज्ञानाच्या मनोरंजक तथ्यांवर आधारीत व्हिडिओज.

https://youtube.com/@scishowkids?feature=shared

*It’s AumSum Time: Science and what if series

https://youtube.com/@aumsum?feature=shared

@peekaboo_kidz

https://youtube.com/@peekaboo_kidz?feature=shared

हा चॅनल हिंदी मध्ये👇

@binocskiduniya

https://youtube.com/@binocskiduniya?feature=shared

*निसर्ग*

*National Geographic Kids* – विज्ञान, प्राणी, आणि निसर्गाबद्दल माहिती देणारा चॅनल.

https://youtube.com/@natgeokids?feature=shared

*कला आणि सर्जनशीलता*

*Art for Kids Hub* – मुलांना चित्रकला शिकवणारा चॅनल.

https://youtube.com/@artforkidshub?feature=shared

*Disney India* चॅनल चा *Art Attack*

https://youtube.com/playlist…

*Mister Maker India हिंदी*

https://youtube.com/@mistermakerindia?feature=shared

*इतिहास*

Raashtra Sevak

https://youtube.com/@raashtrasevak?feature=shared

*PBS Eons* चे चॅनल: पृथ्वीवरील जीवनाचा इतिहास

@eons

https://youtube.com/@eons?feature=shared

@pbskids

https://youtube.com/@pbskids?feature=

मुलांसाठी हे शैक्षणिक आणि मनोरंजक चॅनल्स आहेत. *तुम्हाला काही चॅनल्स माहित असल्यास कृपया आमच्या बरोबर शेअर कर

मुलांवरच्या मालकी हक्कात आपण स्वतःला तर विसरून जात नाही आहोत ना???

डाॅ. स्वाती गानू 

प्रसंग १

सारा आणि जुई नऊ वर्षांच्या एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन छोट्या मैत्रिणी, घराच्या मागच्या टेरेसवर भातुकली खेळत होत्या. सारा म्हणाली, “अग जुई माझी इतकी घाई आहे न किचनमध्ये लंच करायचंय . मग टिफीन पॅक करायचे. रौनकला शाळेत सोडायचंय .” आणि मुव्ह फास्ट असं ती स्वतःशीच बडबडली . जुई म्हणाली ,” सारा मला पण दुपारी सुरभीला स्कूलमधून आणायचंय . तिचं खाणं झालं की ट्यूशन , नंतर आणखी दोन क्लासेसला घेऊन जायचंय , आणायचं. कस्सा दिवस संपतो कळतच नाही.एकमेकींचं बोलणं ऐकून मग त्या खुदुखुदू हसत सुटल्या . दोघीही आपल्या आईची नक्कल करत होत्या. तेवढ्यात त्यांच्याबरोबर असणारी मात्र गप्पगप्प असणारी मैत्रेयी म्हणाली, “मला न माझ्या आईसारखं नाही व्हायचंय . सारखं कुठल्यातरी क्लासला घेऊन जाणारी .” मला तिच्याबरोबर , बाबांबरोबर राहायचंय मात्र त्यांना हे समजतच नाही . मला आजीसारखं व्हायचंय . आजी कशी छान राहते . सारा आणि जुई तिचं बोलणं ऐकून म्हणाल्या, “आम्हाला पण तुझ्यासारखंच वाटत मैत्रेयी .

Read more

अभ्यास करण्याचे टेक्निक

अभ्यास करण्याचे हे टेक्निक वापरून पहा.

   डाॅ.स्वाती गानू टोकेकर 

 मुलांचं पूर्ण दिवसाचं गच्च वेळापत्रक पाहिलं की साडेचार तास शाळा,येण्याजाण्यासाठी अर्धा ते एक तास, ट्यूशन किंवा क्लासचे दोन तास असे किमान सात ते नऊ तास मुलं अभ्यास नामक गोष्टीसाठी मुलं गुंतलेली असतात. उरलेल्या वेळेत होमवर्क, असाईनमेन्ट, प्रोजेक्ट पूर्ण करतात.सेल्फ स्टडी करता वेळही नसतो आणि एनर्जीही नसते.इच्छा तर मुळीच नसते पण अभ्यास तर करावाच लागतो.परीक्षा जवळ आली की पालकांकडूनही प्रेशर यायला सुरुवात होते.मुलांमध्ये स्थिरता कमी असल्याने बैठक फार तर अर्ध्या तासाची असते.मुलं कंटाळतात म्हणून अभ्यास करण्याचे हे टेक्निक वापरून पहा.

●या टेक्निकला PORODOMO म्हणतात.

●Francesco Cirilo या व्यावसायिकाने 1980 च्या उत्तरार्धात हे टेक्निक वापरलं.तो टायमर म्हणून टोमॅटोच्या आकाराचे घड्याळ वापरायचा.इटालियन भाषेत टोमॅटोला Pomodoro म्हणतात. म्हणून या टेक्निकचं नाव Pomodoro पडलं.

Read more

आपल्याला आपल्या मुलांचा राग का येतो?

आपल्याला आपल्या मुलांचा राग का येतो?

प्रत्येकाची स्वतःची एक प्रतिमा असते. आपण स्वतःबद्दल जो विचार करतो ती आपली प्रतिमा बनते. आपण आपली प्रतिमा एकटेच नाही बनवत. अनेक बाहयघटक त्यासाठी कारणीभूत असतात. आपली प्रतिमा ही बऱ्याच अंशी आपल्या बालपणीच्या अनुभवांवर अवलंबून असते. आपल्या आईवडिलांची आपल्याविषयीची मतं, आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारलेले टोमणे, मित्रमैत्रिणींची आपल्याविषयीची मतं, शाळेतील अनुभव; या आणि अशा अनेक घटकांनी प्रेरित होऊन आपण स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो. आपल्या मनाला आपण सांगतो की हा मी असा आहे किंवा ही मी अशी आहे.

Read more

*माफ करा पण शिक्षक आहे म्हणून बोलावेसे वाटते.

*माफ करा पण शिक्षक आहे म्हणून बोलावेसे वाटते……*
खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का…?????
मला असे वाटत नाही..
बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरु झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे…..
पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास स्क्रीन समोर आहेत…. आणि याच स्क्रीन साठी ते पॅनिक होत आहेत… तुमचे खरेच आहे की लॉकडाऊन मुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे…. पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात… याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले…. छान…. पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय????? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे…. मुलांना शिक्षकांची गरजच वाटेनाशी होत आहे. आता काय सगळेच यूट्यूब वर आहे… कशाला माहिती डोक्यात साठवा.. असेही मुलं सहज म्हणतात… मी या शिक्षणाच्या विरोधात नाही आहे…. पण लहान मुलांच्या डोक्यात इतक्या झपाट्याने आदळतंय की ती मुलं बिचारी कावरीबावरी झाली आहेत. त्यात आता परिस्थिती मुळे मुलं 24तास घरात आहेत मग मनोरंजना साठी टीव्ही, मोबाईल ओघाने आलेच…. बापरे…..
मुलांच्या कल्पकतेला, सृजनतेला आपण वेळ देत आहोत का????( आपण मध्ये सगळेच आलो )
अनेक तत्ववाद्यांचे, शिक्षण तज्ज्ञांचे असे मत आहे की “शांततेत सृजनता फुलते..”
मुलांना शांतता द्या.. त्यांना रिकामा वेळ द्या. ती मुले स्वतः च आपले खेळ निर्माण करतात, नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती जेव्हा खेळ निर्माण करतात तेव्हा ते अभ्यासच करत असतात. शिकवण्यापेक्षा स्वतः च्या चुकांतून, अनुभवातून शिकण खूप मोलाचे आहे. रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे, महात्मा गांधी यांचे फक्त गोडवे न गाता त्यांची शिक्षण पद्धती अमलात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे….. काय माहिती आज पालकांना ऑनलाईन अभ्यासाची गरज भासऊन त्यांना पॅनिक करून, ऑनलाईन अभ्यास नाही केला तर मुलं ‘ढ’ राहतील असा बिनबुडाचा धोका निर्माण करून काही लोक करोडो कमवत नसतील ना????? …. याचा विचार करा….
आपण सुजाण पालक आहोत
सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत… आई आणि बाबा म्हणून वेळ देऊया मुलांना… माझ्यात व्यक्ती म्हणून जे चांगले आहे ते देऊया ना आपण मुलांना. महेश काळे यांची पहिली संगीताची गुरु त्यांची आईच आहे इथे खूप उदाहरणे देता येतील विज्ञान क्षेत्रात, कला क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांच्या उत्कर्षाचा पाया त्यांच्या आई वडिलांनी उभा केला आहे.. वडील तबला वादक आहेत मुलाला शिकवा, आई छान स्वयंपाक करते शिकवा, अक्षर सुंदर असणे, रांगोळी छान काढणे, कपाट नेटके लावणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, बुद्धिबळ, नवा व्यापार, शिकवणे. मुलांना मनाचे श्लोक, गीतापठण, निबंध लेखन, गणित, तुमची मातृभाषा शिकवा फार गरज आहे आता…..गाणी, नृत्य, कविता लिहिणे.., गोष्ट सांगने आणि तयार करणे इत्यादी……. एक माझ्या ओळखीतले गणिततज्ञ आहेत एकदा त्यांना विचारले कशी काय गणितात आवड निर्माण झाली… तर ते म्हणाले, की माझे बाबा रोज एक गणित फळ्यावर मी उठायच्या आत लिहून ठेवत आणि ते सोडवल्यावरच खाली खेळायला सोडत असत, रोज वेगळा विचार वेगळं गणित मज्जा येत असे…यातच गोडी लागली… जेवना आधी रोज पाढे….
बऱ्याच गोष्टी आहेत हो ज्या आपण मुलांना शिकवू शकतो आपल्या भावनांचा स्पर्श असतो तिथे. आपले मातृत्व आणि पितृत्व आपण देत असतो. थोडक्यात संस्कारांची शिदोरी आपण या शिकवण्यातून देत असतो….
सोपे सांगायचं तर quality time द्या मुलांना
आपण स्वतः जे काही शिकवतो त्याद्वारे आपण नसल्यावरही आपण त्याच्या बरोबर असू…..सतत….त्यांच्या सुंदर आठवणीत….विचार करा आणि या ऑनलाईन च्या गुदमरुन टाकणाऱ्या, ताण देणाऱ्या शिक्षणापेक्षा आपला वेळ, सहवास त्याना देऊया कारण नोकरी मुळे आई बाबांना मुलांसाठी वेळच नसतो….ही चांगली संधी आहे मुलांना समजून घेण्याची आणि आईबाबा काय आहेत हे कळवून देण्याची…..मुलांशी बोला, गप्पा मारा, त्यांचे मित्र बना…..
“मुलं फार लवकर मोठी होतात हो….. ” वेळ नाही देत आपल्याला…………..c&p

Read more

Breastfeeding series 3

डिलिव्हरी झाल्यावर पहिल्या तासात बाळाला breastfeeding दयावे 👍 त्यानंतर बाळ बरेच दा झोपी जाते .
बाळाचे “feeding cues ” असतात .ह्याचा अर्थ बाळा ला भूक लागल्यावर काही सिग्नल्स देत असते त्याला फीडिंग cues म्हणतात ,ते काय असतात ते मी आता सांगते .
👶🏻1. Lip smacking ,ओठांची चोखण्या सारखी हालचाल करणे
2.👶🏻Head turning to look for breast _ डोके एकबाजूला वळवून स्तनाचा शोध घेणे
3.👶🏻Hand and fist moving to mouth _ हात आणि मूठ तोंडात घालायचा प्रयत्न करणे

Read more

Planning ,management and execution is the key for good and happy parenting

Pregnancy कन्फर्म झाली की ती पुढे जाऊ द्यायची की नाही? ह्याचा निर्णय हा आई आणि बाबांनी मिळून घ्यायचा असतो .आपण भावनिक ,शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने ही नवीन जबाबदारी पेलायला सक्षम आहोत का ? ह्याचा विचार व्हावा .तसेच जसे पूर्वी एकत्र कुटुंब असायचे ,त्यामुळे मुले सांभाळणे ही जबाबदारी एकट्या आईवर पडत नसे ,किंबहुना तिच्याकडे मुल फक्त स्तनपानासाठीच आणले जायचे , इतर वेळेस ती आपली दुसरी कामे करू शकत असे .पण आता ती परिस्थिती नाही ,त्यामुळे बाळाची जबाबदारी घेण्याअगोदर हा विचार नक्कीच केला जावा .

Read more

Breast feeding series 2

Breast feeding series no 2
गरोदरपणात वेळच्या वेळी केलेल्या आपल्या स्त्रीरोगतज्ञांच्या visits खूप महत्वाच्या असतात .आईचे वजन ,रक्ताचे प्रमाण , सोनोग्राफी ,काही रक्ताच्या गरजेच्या तपासण्या ह्याच्या बरोबरच एकदा पहिले गरोदरपण असलेल्या आईने आपले स्तन त्यांच्या कडून तपासून घ्यायला हवे ! काही स्त्रियांमध्ये स्तनाग्रे ( nipples) ही आत मध्ये वळलेली असतात / रुतून बसल्यासारखी ती stimulate केल्यावर टोकदार होत नाहीत ( inverted / retracted nipples ). असे काही असल्यास पुढे बाळाला स्तनपान करतांना प्रॉब्लेम येऊ शकतो .तुमच्या डॉक्टर तुम्हाला retracted nipples च्या ग्रेडिंग नुसार उपाय सांगू शकतात .जास्त retraction नसेल तर हलक्या बोटांनी रोज तेल लावून ते बाहेर ओढण्याचा व्यायाम ,किंवा 20 CC ची syringe वापरून एक vaccume pump तयार केला जातो ( त्याची माहिती मी या आधी एका स्तनपानाच्या व्हीडिओ मध्ये आधी दिलेली आहे ) तो वापरून स्तनाग्रे बाहेर खेचली जातात .

Read more