Back to Top

Author Archives: swarda

बाबांच्या आणि लेकरांच्या हरवलेल्या? संवादाची……… कहाणी

Read more

Scoolpreparation #शाळेचीतयारी

#Scoolpreparation
#शाळेचीतयारी

अशी करा शाळेची आणि शैक्षणिक वर्षाची तयारी –
👔🎒👟🎨📚

मे संपत आलेला आणि जूनची चाहूल म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात…

अर्थातच शाळेच्या पूर्वतयारीची ही वेळ. हल्ली दोन्ही पालक नोकरी/ उद्योग यात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांना मदतीला घेऊन नीट नियोजन करा आणि शाळेची तयारी एन्जॉय करा… तयारी आधीपासून करून ठेवली तर एनवेळची धावपळ वाचते. 🥳🥳

१. शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी करा.

📍 वह्या – पुस्तके

Read more

#Aptitudetest #Careerguidance #Careercounseling

#Aptitudetest
#Careerguidance
#Careercounseling

Aptitude test – कल किंवा अभिक्षमता चाचणी – का करायची किंवा करायची नाही?

❌✅⚓

साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत करिअरचे मोजके पर्याय लोकांना माहीत होते. इंजिनियर, डॉक्टर, वकील, रेल्वे, पोस्ट, नर्स, शिक्षिका, सरकारी किंवा खासगी नोकरी, कारखान्यात नोकरी इ.
👩‍🎓👩‍🏫👷🤵⛑️

ज्यांचा घरचा काही व्यापार, उद्योग धंदा, दुकान वगैरे असेल ते तोच पुढे चालू ठेवत. नाटक, सिनेमा किंवा खेळ ही लौकिकार्थाने ‘वाया गेलेल्यांची’ क्षेत्रे होती

Read more

गणित #शिवणकला

#गणित
#शिवणकला

“ज्याला शिवणकाम चांगले जमते त्याचे गणित चांगले असतेच.”
या विधानाचा व्यत्यासही सत्य होऊ शकतो 😅

दोन्हीतले कॉमन टॉपिक

* लांबी, रुंदी, उंची
* गुणोत्तर, प्रमाण, पट
* ल.सा. वि, म. सा. वि.

Read more

बबड्या

बबड्या-

 

एखाद्या कुटुंबातल्या मुलाचा बबड्या कसा होतो? हा खरोखरच आवर्जून वेळ काढून अभ्यासण्यासारखा विषय आहे.
वयाची विशी उलटून गेलेल्या आपल्या बबडूच्या अंथरूणाची घडी घालणं, बेडवरची विस्कटलेली बेडशीट व्यवस्थित घालणं, बबडूचे कपडे धुवायला टाकणं, त्याच्या खोलीतलं टाॅयलेट स्वच्छ करणं, चहा-काॅफी-दूध-नाश्ता सगळं सगळं अगदी हातात आणून देणं, बबडूला डबा देणं, रोज संध्याकाळी त्याच्या सॅकमधून तो डबा काढून धुवून ठेवणं, बुटात तसेच राहीलेले किंवा इतरत्र पडलेले पायमोजे शोधून धुवायला टाकणं इत्यादी कामं रोजच्या रोज अगदी नियमितपणे करणाऱ्या आया मी पाहिल्या आहेत.

Read more

समुपदेशनाची गरज आणि महत्व

समुपदेशनाची गरज आणि महत्व

अगदी सहा महिन्याचे बाळ सुद्धा आपल्या नैसर्गिक मनमोहक हालचाली करून जवळच्या व्यक्तीचे मन आपल्याकडे आकर्षित करते, वाढत्या वयानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्याला जवळ घ्यावे, आपल्यावर खूप प्रेम करावे, आपल्यासोबत खूप गप्पा माराव्यात, आपल्यासोबत भरपूर खेळावे अशी अपेक्षा ठेवते, दोन वर्षाच्या मुलाची याच अपेक्षेतून सतत बडबड सुरूच असते. पुढे शाळेत जायला सुरुवात झाली की कितीतरी गोष्टीची खटाटोप सुरु असते, किशोरावस्थेत मित्र, शिक्षक, कुटुंब यांच्याकडून अपेक्षा या असतातच.

Read more

कोन

(1) त्रिकोणाला बाजू — तीन📐

(2) त्रिकोणाला शिरोबिंदू — तीन

(3) त्रिकोणाला कोन — तीन📐

(4) आयताला बाजू — चार 🖼️

(5) आयताला शिरोबिंदू — चार

(6) आयताच्या समोरासमोरील बाजू — समान लांबीच्या

(7) आयताचे चारही कोन — काटकोन

(8) चौरसाला बाजू — चार 🔲

(9) चौरसाला शिरोबिंदू — चार

(10) चौरसाला कोन — चार 🔲

(11) चौरसाच्या चारही बाजूंची लांबी — समान

(12) चौरसाचे चारही कोन — काटकोन

(13) 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोन — लघुकोन

(14) 90 अंशाच्या मापाचा कोन — काटकोन

(15) 90 अंशापेक्षा जास्त माप असणारा कोन — विशालकोन

नाश्त्याचे पदार्थ

नाश्त्याचे पदार्थ

#उपमा –

१) कॉर्न उपमा, मटार उपमा, गाजर-फ्लॉवर घालून केलेला उपमा,

२) साधा उपमा – आलं-मिरची वाटून, फोडणीला उडदाची डाळ-कढीपत्ता घाला, साखर-मीठ घाला. वर ओलं खोबरं, कोथिंबीर घाला.

३) सांजा – गव्हाचा रवा (दुकानात रेडीमेड मिळतो (दलिया) ) भाजून घ्या. फोडणीला सुकी लाल मिरची, उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ आणि कढीपत्ता घाला. नेहमीच्या उपम्यासारखा करा.

#पोहे –
१) कांदे पोहे

Read more

वाघाटीची भाजी

द्वादशीला करण्यात येणारी वाघाटीची भाजी

आषाढ महिन्यात येणारी वाघाटी म्हणजेच अमृत फळ, गोविंद फळ ही एक रानभाजी. ह्या भाजीत अनेक औषधी गुण आहेत उदा. कफ नाशक, वात नाशक, पित्त नाशक, भूक न लागणे, उष्णता मुळे अंगावर गळवे उठणे, कॅन्सर, गजकर्ण, इसब सोरायसिस मुळे पडलेल्या भेगा, भगंदर, थायराईड, लघवी न होणे, अपचन , त्वचा विकार ह्यावर उपयुक्त असून धातू पुष्ट होणे, रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे.

द्वादशीला करण्यात येणारी वाघाटी भाजीची रेसिपी

Read more

कंटोळी (कर्टुल) – रानभाजी

कंटोळी (कर्टुल) – रानभाजी

माहिती:
पावसाळयातील पालेभाज्या आणि फुलभाज्यांनंतर ही एक फळभाजी आहे. पावसाळा सुरू झाल्यावर जुन्या वेलीच्या मुळाच्या गाठीपासून किंवा बिया रूजून ह्या वेलींना फुटवा फुटतो. त्याची झपाटय़ाने वाढ होऊन पाच ते सहा पानांवर असतानाच जंगलांत सर्वत्र हया जमिनीलगत वाढलेल्या वेलींवर पिवळी फुले दिसू लागतात. बारा-पंधरा दिवसातर कंटोली धरतात. कंटोळी फळांची भाजी खूपच लोकप्रिय आहे. फळे साधारणत: पाच ते सात से.मी. लांबीची असतात. आकाराने लांबट-गोल असतात व त्यावर मऊ काटे असतात. फळात बीया भरपूर असतात. कोवळ्या फळांची भाजीच चांगली होते. भाजी रूचकर असते पण चिकट असते. विविध प्रकारांनी ही भाजी केली जाते. कारल्याच्या वर्गातील असल्याने औषधात त्याचे कडू गुणधर्म असून ते जठरोतेजक व सारक आहेत.

Read more