Back to Top

Author Archives: swarda

‘कुलामामाच्या देशात’

‘कुलामामाच्या देशात’ एक अदभूत वन कथा संग्रह
———————————————–
लेखक: जी बी देशमुख

पृष्ठ:१३५ मूल्य:२००/ टपाल:३५/ एकुण:२३५/

मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेले “कुलामामाचे देशात “हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. दिवसेंगणिक या पुस्तकाला वाढते समिक्षण वाचून परत वाचण्याचा मोह झाला.

अमरावतीचे प्रसिध्द साहित्यीक तथा केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याचे वरीष्ठ अधिकारी श्री जी. बी. देशमुख यांनी त्यांचे मित्र वन विभागाचे मुख्य वन संरक्षक श्री. रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्याने त्याच्या मेळघाटातील १७ वर्षाचे सेवाकाळात

Read more

लक्ष्मीची पावलं

लक्ष्मीची पावलं..
पूर्णिमा ऑफिसमधून निघतच होती, तितक्यात साहेबांनी बोलावल्याचा निरोप आला. केबिनमधे शिरताच साहेबांनी तिला एक लिफाफा दिला. तिनं तिथंच उघडून पाहिलं. पुण्याच्या एनआयबीएममधे एका आठवड्याच्या इन्फ्रास्ट्रक्टर फायनान्सिंगच्या ट्रेनिंगसाठी तिचं नॉमिनेशन होतं. दिल्लीतल्या मोठ्या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीत एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तिची चांगलीच ख्याती होती. तिने सस्मित मुद्रेने साहेबांना ‘थॅंक्स’ सांगितलं. साहेब फायलीत गुंतले होते. तिनं अदबीने विचारलं, “सर, इफ यू डोंट माईंड…ट्रेनिंगनंतर मला तीन दिवसांची सुटी हवीय. माझं माहेर पुण्याचं आहे…” पहिल्यांदाच मान वर करून साहेब म्हणाले, “ओके, मॅम. फ्लाईटची तिकीटं त्याप्रमाणे बुक करायला सांगा.”

Read more

चेहरा

“मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन.”

जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, “सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?”

फेमी म्हणाले:

Read more

अंडे विट

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात
येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते
कोणत्या बाबतीत आहे ?
.
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.

Read more

क्या भात है!!

🔸क्या भात है!!🔸

सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला घेतलेली आहे. विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा थोडी जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच चिंतेची आहे.

Read more

प्रक्रिया # ५

प्रक्रिया # ५

भूगोल शिकवायला सुरुवात केली की कुठे कुठे जातो, कुठल्या विषयांना स्पर्श करतो ह्याला काही बंधनच नसतं.

फेब्रुवारी-मार्च २०२२ च्या संदर्भ अंकातील मोबी-डक गोष्ट वाचली, जगाचा नकाशा समोर ठेवून. चीनहून एक मालवाहू जहाज अमेरिकेकडे २८८०० खेळणी घेऊन जात होते. पिवळी बदके, निळी कासवे, हिरवे बेडूक, अशी ती प्लॅस्टिकची bath toys होती, म्हणजे bath टब मध्ये पाण्यावर तरंगणारी खेळणी.

उत्तर पॅसिफिक महासागरात अचानक वादळ झालं आणि काही जहाजे बुडली. ह्या खेळणी घेऊन जाणाऱ्या जहाजालाही जलसमाधी मिळाली. २८,८०० खेळणी महासागरात पसरली.

Read more

प्रक्रिया # ४

प्रक्रिया # ४
निसर्गात सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. हे नुसतं न सांगता ‘Web of Life’ ह्या खेळातून प्रत्यक्ष बघता येतं. आज तो खेळ खेळलो.

हा खेळ धर्मराजने मला शिकवला होता. एका वर्कशॉपमध्ये मागे हा खेळ मी घेतला होता. जुईली त्यावेळी बरोबर होती. वर्कशॉपनंतर ती माझी कार्डस घेऊन गेली आणि त्यात सुधारणा करून मला सेट आणून दिला.

Read more

प्रक्रिया # ३

प्रक्रिया # ३

“शत्रूकडे असे काय जास्त होते आणि आमच्याकडे असे काय कमी होते?

इथे सह्याद्री होता, सातपुडा होता, समुद्र होता, समृद्ध संपत्ती होती, बलाढ्य मनगटे आणि धाडसी छाताडे होती, तरीही पराभव? का?

कारण कमी पडले अचूक नेतृत्व. कमी पडला भोवतालच्या जगाचा आणि शत्रूपक्षाचा अभ्यास.

आम्ही नरसिंहांच्या, श्रीकृषणांच्या आणि श्रीरामांच्या फक्त पूजा आणि आरत्या केल्या. अभ्यास आणि अनुकरण कधी केलेच नाही.

या आक्रमकां

Read more

प्रक्रिया डायरी #२

प्रक्रिया डायरी #२

मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणीच पाणी चहूकडे अशी अवस्था आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदी दुथडी भरून वहात आहे. त्यात आज आहे, १२ जुलै.

मुलांशी ’१२ जुलै १९६१ पानशेत प्रलय’ ह्याबद्दल आज गप्पा मारल्या. मुठा नदी, तिच्या दोन उपनद्या आणि पुण्याला पाणी पुरवठा करणारी चार धरणे ह्याबद्दल मागच्या आठवड्यातच बोललो होतो.

Read more

मुलाने बाहुलीला फास लावला आणि स्वत:लासुद्धा

मुलाने बाहुलीला फास लावला आणि स्वत:लासुद्धा.
बातमी वाचली.

मुलांसाठी खरं खोटं असं काहीच नसतं. त्यांना सगळी दुनिया खरी वाटते कारण ती सत्यात जगत असतात. मोबाइल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत. खोटं आहे. हे त्यांना कळत नाही.

त्या एका नातवाची गोष्ट आपण ऐकलेली असेलच. आजोबा, नातू रस्त्यावरून जाताना आजोबांना गाडीचा धक्का लागला आणि ते रस्त्यावर पडले. नातू जोरात हसायला लागला. कारण त्याला वाटलं की कार्टूनमध्ये दाखवतात तसं आजोबा काहीही न होता आपोआप उभे राहतील. जखम होणे, दुखावणे या गोष्टी कार्टूनमध्ये नसतात. मुलाला तेच खरं वाटत होतं. बरीचशी कार्टून बघणारी मुलं बोलताना त्या कार्टूनमधल्या लोकांसारखीच बोलतात, तशीच वागतात.

Read more